IFFI 2021: मार्टिन आणि इस्टेवान यांचा ‘सत्यजीत रे जीवनगौरव’ पुरस्काराने होणार सन्मान

श्री इस्टेवान स्झाबो आणि श्री मार्टिन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी केली.

Istvan Szabo and Martin Scorsese will be conferred the Satyajit Ray Lifetime Achievement Award
IFFI 2021: मार्टिन आणि इस्तवान यांचा 'सत्यजीत रे' जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान

यंदाच्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्री इस्टेवान स्झाबो आणि श्री मार्टिन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी केली. मेस्टिस्टो (1981) फादर (1966) सारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जाणारे इस्तवान स्झाबो हे गेल्या अनेक दशकांतले समीक्षकांनी गौरवलेल्या प्रमुख हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तर मार्टिन स्कॉर्सेझ हे हॉलीवूडच्या नव्याधारेतील प्रमुख व्यक्तीमत्व आहेत, त्यांना चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते.

 

“भारत कथा सांगणाऱ्यांचा देश आहे; आमच्या कथांमधे जगाचा सार पकडला गेला आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण कथावस्तू त्यामुळे आपल्याला एक समर्पक आणि ‘आशयघन उपखंड’ बनवतात असे श्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाची 52 वी आवृत्ती येत्या 20 ते 28 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत सागरकिनाऱ्याने संपन्न अशा गोवा राज्यात आयोजित केली जाणार आहे.

 

ओटीटी (ओव्हर द टॉप, दृक् श्राव्य आशय प्रदर्शित करणारे ऑनलाइन व्यासपीठ) मंचाशी संबंधित आघाडीच्या संस्थांबरोबर सहयोग यंदा इफ्फीने प्रथमच ओटीटी मंचाशी संबंधित आघाडीच्या संस्थांना महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, झी5, व्हूट आणि सोनी लिव हे पहिल्यांदाच विशेष वर्ग, नव्या आशयाचे सादरीकरण आणि पूर्वावलोकन, संग्रहीत चित्रपटांचे प्रदर्शन आणि इतर विविध प्रत्यक्ष तसेच आभासी माध्यमातील कार्यक्रमांद्वारे महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती श्री ठाकूर यांनी दिली.

 


हे हि वाचा – RSS शी तुलना तालिबानशी करणे जावेद अख्तरना पडणार महागात, महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल