घरताज्या घडामोडीनाट्यगृहांचा पडदा अखेर उघडला, दोन वर्षांनंतर कलावंतांना दिलासा

नाट्यगृहांचा पडदा अखेर उघडला, दोन वर्षांनंतर कलावंतांना दिलासा

Subscribe

रंगकर्मींच्या उपस्थितीत परशुराम साईखेडकर आणि महाकवी कालिदास कलामंदिरात झालं रंगमंच पूजन

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगकर्मी दीपक करंजीकर आणि विद्या करंजीकर यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून नाट्यगृहाचा पडदा उघडण्यात आला. तर, कालिदास कलामंदिरात नाट्य परिषद पदाधिकार्‍यांच्या हस्ते रंगमंचाचं पूजन करण्यात आलं. यावेळी रंगकर्मींसह तंत्रज्ञ उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुहानी नाईकसह हौशी कलावंतांनी एकपात्री प्रयोग सादर केला. या पहिल्याच प्रयोगाला उपस्थित रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यमंदिरात सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता करण्यात आली. रंगमंच आजपासनं खुले झाल्यानं शहरातल्या सांस्कृतिक वर्तुळात आनंदाचं वातावरण आहे. गेल्या दीड वर्षांपासनं रोजगारापासून वंचित असलेल्या कलावंतांच्या हाताला काम मिळणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -