घरदेश-विदेशजम्मू-काश्मीर DDC निकाल : गुपकार गटाची बाजी; भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

जम्मू-काश्मीर DDC निकाल : गुपकार गटाची बाजी; भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर आणि केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या. जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा वाकास परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी समोर आला. या निवडणुकीत गुपकार गटाने बाजी मारली असली तरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गुपकार गटाने काश्मीर घाटी तर भाजपने जम्मू क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भाजपने या निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीत भाजपविरुद्ध सात पक्ष एकत्र येत गुपकार आघाडी स्थापन केली होती. गुपकार आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय या पक्षांचा समावेश आहे.

भाजपने या निवडणुकीच्या माध्यमातून काश्मीर घाटीमध्ये खाते उघडले आहे. शिवाय, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अंतिम निकालानुसार, भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत, तर गुपकार गटाला ११२ जागा मिळाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सला ६७ जागा, पीडीपी २७ जागा, पीपल्स कॉन्फरन्स ८ जागा, काँग्रेसला २६ जागा मिळाल्या आहेत.

- Advertisement -

BJP – 74
J&K NC –  67
Independent – 49
J&K PDP – 27
INC – 26
JKAP – 12
JKPC – 8
CPI (M) – 5
JKPM – 3
PDF – 2
JKNPP – 2
BSP – 1

निवडणुकांच्या निकालानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी गुपकार गटाला मतदान करत ज्या प्रकारे कलम ३७० हटवण्यात आला, त्याला पूर्णपणे नाकारण्यात आले आहे. शिवाय, नँशनल काँन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटले की, आम्ही या निवडणुकीत जास्त प्रचार केला नाही. तरीही लोकांनी आमचा पाठिंबा दर्शविला आहे, केवळ काही जिल्ह्यांमध्ये भाजपने नेत्रदीपक विजय मिळवला आहे.

- Advertisement -

या निवडणूकीत भाजपने खूप मेहनत घेतली होती. त्याचा परिणामही चांगला झाला आहे. जम्मू प्रदेशातील १० पैकी ६ जिल्ह्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजप येथे आपले डीडीसी अध्यक्ष करेल. जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर, दोडा आणि रेसाई या जिल्ह्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -