घरताज्या घडामोडीपुढील ५ वर्षात ४२ अब्ज डॉलर भारतात गुंतवणूक करण्याचे जपानचे लक्ष्य; द्विपक्षीय...

पुढील ५ वर्षात ४२ अब्ज डॉलर भारतात गुंतवणूक करण्याचे जपानचे लक्ष्य; द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींची माहिती

Subscribe

जपान पुढील ५ वर्षात ४२ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदासोबत (Japanese PM Fumio Kishida) दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भारत आणि जपानमध्ये दरवर्षी शिखर बैठक आयोजित केली जाते. दोन्ही देशांमध्ये एकूण सहा करारांवर स्वाक्षरी केली गेली आहे. सध्या जगभरात यक्रेन आणि रशिया युद्धामुळे चिंता वाढली असताना भारत आणि जपानमध्ये द्विपक्षीय बैठक झाली आहे. दरम्यान किशिदा भारतच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळसोबत आले होते. पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिल्याच भारत दौरा होता.

जपानचे पंतप्रधान किशिदा हे काल संध्याकाळी ४च्या सुमारास भारतात पोहोचले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधिमंडळात मोठी बैठक झाली. किशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बराच काळ चर्चा केली. यापूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे जेव्हा २०१४मध्ये भारतात आले होते, त्यांनी ५ वर्षात ३.५ ट्रिलियन येन गुंतवणूक आणि मदत करण्याची घोषणा केली होती.

- Advertisement -

दरम्यान बऱ्याच काळापासून जपान भारताला शहरांचा विकास आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी मदत करत आहे. यामध्ये हायस्पीड रेल्वेचा समावेश आहे, ज्याअंतर्गत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सामील आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानी पंतप्रधान किशिदांमध्ये हैदराबाद हाऊसमध्ये बातचीत झाली होती. दोन्ही देशांनी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर जोर दिला. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किशिदा यांनी ऑक्टोबर २०२१मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर फोनवरून बातचीत केली होती. यावर्षी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध कायम असण्याला ७० वर्ष पूर्ण होत आहेत. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान क्वाडच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भागीदारी करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले, लष्करी तळावर लागली भीषण आग


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -