Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी JEE Main 2021: 'जेईई मेन'ची परीक्षा १७ जुलैला होणार; १४ ऑगस्टपर्यंत निकाल...

JEE Main 2021: ‘जेईई मेन’ची परीक्षा १७ जुलैला होणार; १४ ऑगस्टपर्यंत निकाल लागणार

Related Story

- Advertisement -

‘जेईई मेन’ परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. आज, बुधवारी जॉइन्ट एन्ट्रेंस बोर्डने ‘जेईई मेन’च्या परीक्षेची तारीख जारी केली आहे. बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेईई मेन’ची परीक्षा १७ जुलैला होणार असून निकाल १४ ऑगस्टपर्यंत लागणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे ‘जेईई मेन’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बऱ्याच काळापासून या परीक्षेबाबत विचारविनमय केला जात होता. अखेर आज ‘जेईई मेन’च्या परीक्षेची तारीख ठरली आहे.

यंदा ‘जेईई मेन’च्या परीक्षेत देशातील ९२ हजार ६९५ विद्यार्थी १७४ केंद्रावर आयोजित केलेल्या ठिकाणी परीक्षा देतील. जॉइन्ट एन्ट्रेंस बोर्डच्या माहितीनुसार, परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीन टप्प्यात विद्यार्थ्यांचे काउंसलिंग पूर्ण केले जाईल. १५ सप्टेंबरपर्यंत काउंसलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्लॅन आहे. बऱ्याच वेळापासून विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या या परीक्षेच्या तारीखेची वाटत होते. शेवटी बोर्डाने परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

एप्रिल महिन्यात ‘जेईई मेन’ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊनमुळे ‘जेईई मेन’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या भीतीमुळे जेईई, नीटसह अनेक परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षा स्थगित केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने हा निर्णय घेतला होता. तसेच कोरोनामुळे केंद्रीय आणि राज्यांच्या बोर्डने १० वी आणि १२ वी बोर्डची परीक्षा रद्द केली होती.

आता देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परंतु अजूनही भीती कायम आहे. देशातील गेल्या २४ तासांत ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट देखील कहर करत आहे, जो खूप धोकादायक आहे. अशा परिस्थितीत ‘जेईई मेन’ची परीक्षा दरम्यान कठीण नियमांचे पालन केले जाईल. जॉइन्ट एन्ट्रेंस बोर्डने सुरक्षित पद्धतीने परीक्षा आयोजित करण्याचा आराखडा तयार केला आहे.

- Advertisement -