घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांना लुटून वसुली करण्याचं काम राज्य सरकार करतंय, निलंगेकर यांचा आरोप

शेतकऱ्यांना लुटून वसुली करण्याचं काम राज्य सरकार करतंय, निलंगेकर यांचा आरोप

Subscribe

१ रुपया देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्कारणी लागला नाही

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. जसा गृह विभागामध्ये वाझे आहे तसा कृषी विभागामध्येही वाझे निघाला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचे काम सरकार करत आहेत. जणीवपुर्वक खासगी कंपन्यांना हाताशी धरून लागणाऱ्या बियाण्यांची टंचाई सरकार निर्माण करत आहे. अधिकच्या भावात बियाणे आणि खत घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार घाबरत असल्यामुळे दोन दिवसांचे अधिवेशन सरकारनं घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. निलंगेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या आपेक्षा आणि प्रश्न हे बांधावर गेल्यावर कळतात परंतु सध्याचे सरकार हे मुंबईचे सरकार आहे. बांद्रातले सरकार आहे. पळपुटं सरकार आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रश्न समोर येणार हे माहित असल्यामुळे सरकारनं अधिवेशनपासून पळ काढला असल्याचा आरोपही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. विविध सगळ्या प्रश्नांवर अधिवेशन बोलवतात परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास घाबरत असल्याचेही संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. २२०० रुपयांची सोयाबीन बियाणांची बॅग बुलढाण्यात ४००० रुपयांना मिळाल्याची उदाहरणे आहेत. म्हणजे एका छोट्या जिल्ह्यात १५० कोटींचा दरोडा टाकला असे म्हणणे वावगे होणार नाही. बांधावरचा निर्णय बांद्रातले सरकार करू शकत नाही. मागच्या वर्षभरात शेतीवरील नियोजनाच्या ४८% खर्च करण्यात आला. त्यात अर्धा पगारावर आणि अर्धा सरकार आणि मंत्र्यांच्या प्रचार व प्रसारासाठी केला गेला. १ रुपया देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्कारणी लागला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारने केवळ अतिवृष्टीच टुरिझम केले. ज्या घोषणा केल्या त्यातील एकही पूर्ण केली नाही. सर्वात मोठ्या प्रमाणावर कृषी विभागाची काळाबाजारी हे सरकार करत आहे. सरकारमध्ये हिम्मत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सामोरे जाण्याची निर्धारित रकमेच्या अधिकची रक्कम देऊन शेतकऱ्याला माल खरेदी करावा लागत आहे, ती रक्कम शेतकऱ्यांना परत मिळाली पाहिजे शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. खरीप आणि रब्बी वेगवेगळे असते हे माहीत नसणारा “राजा” मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे आमचे दुर्दैव असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -