घरताज्या घडामोडीडॉ. नितीन महाजन यांची सीबीआयमार्फत चौकशी करा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

डॉ. नितीन महाजन यांची सीबीआयमार्फत चौकशी करा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Subscribe

मुंबई बडोदरा महामार्गातील प्रकल्प बाधितांना मोबदला न देता दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला देऊन संशयाच्या फेऱ्यात अडकलेले कल्याणचे वादग्रस्त प्रांत डॉ. नितीन महाजन यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

मुंबई बडोदरा महामार्गातील प्रकल्प बाधितांना मोबदला न देता दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला देऊन संशयाच्या फेऱ्यात अडकलेले कल्याणचे वादग्रस्त प्रांत डॉ. नितीन महाजन यांच्या विरोधात आपलं सरकार या पोर्टलवर तक्रारींचा पाऊस पडत असून, महाजन यांच्या कार्यकाळात हजारो कोटींचा अफराटफर झाली असून, त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

प्रांत कार्यालयात हजारो कोटींची अफराटफर?

मुंबई बडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मध्ये कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी भूसंपादीत होत आहेत. मात्र, जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. यामध्ये बऱ्याच भूसंपादीत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम या नियमबाह्य पध्दतीने अदा करून खूप मोठया प्रमाणात आर्थिक देवाण ही एजंट यांच्याद्धारे प्रांत नितीन महाजन आणि लिपीक रेश्मा जायभाये यांच्या संगनमताने करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे, असे केतन पवार यांनी मुख्यमंत्र्याना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणनजिक रायता येथे राहणार्‍या कुसुम सुरोसे यांची जमीन मुंबई-बडोदा प्रकल्पात बाधित होत असून त्यापोटी त्यांना सुमारे १ कोटी ३ लाख ६९ हजार रुपये मोबदला अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी कल्याण प्रांत कार्यालयात वर्षभरापासून पाठपुरावा सुरू केला होता. जमिनीचा सातबारा सुरोशे यांच्या नावावर असताना मोबदला दुसर्‍या व्यक्तीला दिल्याने सुरोसे यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांना कल्याण प्रांत कार्यालयात किटकनाशक प्राशन करून कल्याणचे प्रांत नितीन महाजन यांच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच या मुंबई बडोदा मार्गातील कोट्यावधी रूपयांच्या घोटाळा उजेडात आला असून शेतकरी तक्रारी करण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र, प्रांत महाजन यांची आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आता मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडेच थेट तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार या तक्रारीची दखल घेऊन प्रांत नितीन महाजन यांच्यावर कोणती कारवाई करते याकडे अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

निकटवर्तीयांच्या खात्यात रक्कम

प्रांत डॉ. नितीन महाजन यांनी शासनाचे करोडो रूपये मनमानीपणे स्वत:च्या पदाचा गैरवापर करून निकटवर्तीयांच्या खात्यात जमा करण्याचे आणि त्याविरोधात कोणी आवाज उठवला तर त्याचे पेमेंट थांबवून त्यात तडजोड करायची आणि आपला मोबदला काढून घ्यायचा, असा प्रताप प्रांत कार्यालयात सुरू असल्याचेही मुख्यमंत्रयाच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे निकटवर्तीयांच्या खात्याची चौकशी करण्यात यावी. महाजन यांनी भूसंपादनातील योग्य नुकसान भरपाई अधिकार, स्थानांतरण पून:स्थापना आणि पूर्नवसन अधिनियम २०१३ मधील नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्य पध्दतीने मोबदला रक्कम अदा केल्या असल्याने त्यांच्यावर कलम ८७ शासकीय खात्याकडून अपराध या कलमाखाली चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्रयाकडे केली आहे.


हेही वाचा – एअर इंडियाला एनआरआय अन् एफडीआयचे पंख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -