घरताज्या घडामोडीAirtel, Vi नंतर Jioचा मोठा निर्णय, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत बदल ; जाणून...

Airtel, Vi नंतर Jioचा मोठा निर्णय, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत बदल ; जाणून घ्या नवे दर?

Subscribe

अनलिमिटेड प्लॅन्समध्ये बदल...

नवी दिल्ली – टेलीकॉम कंपनी आपल्या युझर्ससाठी नवनवीन प्लॅन घेऊन येते. कंपनी आपल्या ग्राहकांना किंवा यूझर्सला प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या ऑफरमध्ये बदल करून चांगल्या प्रकारची सुविधा देते. त्यापैकी जिओ कंपनी एक आहे. रिलायन्स जिओ काहीच वर्षांमध्ये देशातील उत्कृष्ट टेलीकॉम कंपनी बनली आहे. परंतु जिओने आपल्या अनलिमिटेड प्लॅन्समध्ये बदल केले असून १ डिसेंबरपासून नवीन प्लॅन लागू होणार आहेत. जिओने आज आपल्या नवीन अमर्यादित योजना जाहीर केल्या आहेत. जागतिक स्तरावर कमी किमतीत सर्वोत्कृष्ट सेवा जिओ देणार आहे.

रिलायन्स जिओचे ७५ रूपये किमतीपासून ते २३९९ रूपयापर्यंतचे प्लॅन –

१ डिसेंबरपासून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या किंमतीनुसार ७५ रूपये जिओच्या प्रीपेड प्लॅनची किंमत आता ९१ रूपये होणार आहे. तर हा कालावधी २८ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला ३ जिबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस आणि ३०० एसएमएस इत्यादी सेवा मिळणार आहे. त्यानंतर १२९ रूपयांचा जिओचा प्रीप्रेड प्लॅन १५५ रूपयांपर्यंत होणार आहेत. तसेच याची वैधता सुद्धा २८ दिवसांसाठी असणार आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस आणि ३०० एसएमएस फ्री सुविधा मिळणार आहे.

- Advertisement -

२३९९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये काय असतील सुविधा?

जिओच्या २ हजार ३९९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅन आता २८७९ रूपयांचा होणार आहे. तसेच त्याची वैधता ३६५ दिवस असणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये ग्राहकांना २जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस आणि दिवसाला १०० एसएमएस फ्री करता येणार आहेत.

- Advertisement -

Jio Platforms Limited ची कंपनी Reliance Jio Infocomm Limited ने ग्राहकांसाठी 4G LTE तंत्रज्ञानासह एक मजबूत नेटवर्क तयार केलं आहे. हे एकमेव दर्जाचे नेटवर्क असून यामध्ये व्हिडिओ नेटवर्क आणि व्हॉईस ओव्हरला एलटीई चांगला प्रतिसाद देणार आहे. त्याचप्रमाणे जिओ कंपनी भविष्यात 4G LTE नंतर 5G, 6G अशाप्रकारचे नवीन तंत्रज्ञान व डेटाचं अपग्रेड करणार आहेत.

दरम्यान, Airtel नंतर Vodafone आणि Idea या भारतातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. त्यानंतर आता जिओने सुद्धा आपल्या ग्राहकांना सोई-सुविधा पुरवण्यासाठी नवीन प्लॅनची घोषणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -