जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमुळे कर्करोग; 2023 पासून कंपनीचे उत्पादन बंद

मागील काही वर्षांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरीवर अनेक आरोप होत होते. त्यामुळे या पावडरीच्या विक्रीत देखील मोठा घट झाला. शिवाय न्यायालयांमध्ये अनेक खटलेसुद्धा दाखल झाले. त्यामुळे आता कंपनीने हे मोठ्ठ पाऊल उचललं आहे.

2023 पासून जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरीच्या कंपनीने पावडरचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे बाजारात जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी मिळणार नाही. खरंतर, जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरमुळे कर्करोगाचा धोका असल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला आहे. शिवाय जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर याप्रकरणी न्यायालयांमध्ये खटलेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. काही महिलांना या पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे त्यांनी या कंपनी विरोधात तक्रार दाखल केली होती.

मागील काही वर्षांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरीवर अनेक आरोप होत होते. त्यामुळे या पावडरीच्या विक्रीत देखील मोठा घट झाला. शिवाय न्यायालयांमध्ये अनेक खटलेसुद्धा दाखल झाले. त्यामुळे आता कंपनीने हे मोठ्ठ पाऊल उचललं आहे. या सगळ्या प्रकरणानंतर कंपनीने कॅनडासोबतचं अमेरिकेतूनही बेबी पावडरचं उत्पादन मागे घेतला. 2020 मध्ये कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनावर अनेक तक्रारी निर्माण झाल्या.

जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरीमुळे कर्करोग होतो, हा अनेकांचा आरोप होता. परंतु हा आरोप कंपनीने फेटाळून लावला आहे. कंपनीच्या मते, कर्करोग होईल असे कोणतेही घटक आमच्या उत्पादनामध्ये नाहीत. पावडरीमध्ये सर्व घटक सुरक्षित आहेत असं कंपनीने सांगितलं आहे.

अमेरिकेत कंपनीविरूद्ध 22 याचिका दाखल
जॉन्सन अँड जॉन्सनची कंपनीवर अमेरिकेमध्ये 22 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये न्यायालयाने कंपनीवर 200 कोटींचा दंड लगावला होता.


हेही वाचा :जम्मू- काश्मीरमध्ये 24 तासात दुसरा दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी जखमी