सर्व गरीब एकत्र आले अन् देशात गरिबांचा पंतप्रधान झाला, रावसाहेब दानवेंनी उधळली स्तुतिसुमनं

Raosaheb Danve

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी नाशिकमध्ये भगूर येथील वीर सावरकर वाड्याला भेट दिली. यावेळी रावसाहेब दानवेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. २०१४ पर्यंत देशात विकास कुठेच नव्हता. तसेच अनेक भागात नुसतीच गरिबी होती. तरीदेखील देशातील सर्व गरीब एकत्र आले आणि देशात गरिबांचा पंतप्रधान झाला, असं भाजप नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, २०१४ पर्यंत गरिबी हटली नाही. त्यानंतर सर्व गरिब एकत्र आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा गरीब पंतप्रधान झाला. आपल्या देशात ८० कोटी लोक गरीब आहेत. मात्र, मोदी सरकार गरिबी हटण्यास मदत झाली. रेशन धान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना केंद्र सरकार देत आहे. कोरोना काळात सुरू झालेली मोफत अन्न धान्य योजना आजही चालू आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत. मात्र, देशातील गरिबी नरेंद्र मोदींच्या काळात कमी झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंत भारतात गरिबी होती. त्यानंतर देशात यांनी एकत्र यायचे ठरविले. सर्व गरिब एकत्र आल्यानंर देशात गरिबांचा पंतप्रधान झाला. तिरंगा झेंडा आपण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला बघतो. त्यामुळे मोदींनी सर्वच घरांवर तिरंगा फडकला पाहिजे अशी संकल्पना मांडली. आज घरांघरांवर तिरंगा फडकत आहे.


हेही वाचा : शिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार