घरताज्या घडामोडीबेजबाबदार नेत्याने गुजरातच्या जनतेची माफी मागावी, जे.पी. नड्डांचा केजरीवालांना टोला

बेजबाबदार नेत्याने गुजरातच्या जनतेची माफी मागावी, जे.पी. नड्डांचा केजरीवालांना टोला

Subscribe

एक नवा पक्ष गुजरातचा अवमान करण्यासाठी आला. त्यांनी एक कागद घेऊन पक्षाचे सरकार येणार असल्याची भविष्यवाणी केली. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा बेजबाबदार नेत्यांनी गुजरातच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. स्वतंत्र भारतात कट्टर ईमानदार असल्याचा बोर्ड घेऊन चालणारा एकही नेता झाला नाही. हे कट्टर बेईमान आहेत, असं म्हणत भाजप पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी अरविंद केजरीवाल यांना अप्रत्यक्षपणे नाव न घेता टोला लगावला.

गुजरातमध्ये सलग ७व्यांदा भाजपचे सरकार अस्तित्वात येणार आहे. या विजयाचा आनंदोत्सव सकाळपासून सुरू आहे. दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही येथे उपस्थित होते. दरम्यान, जे.पी. नड्डा यांनी जनतेला संबोधित करत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मोदींच्या नेतृत्वात आम्हाला गुजरातमध्ये हा विक्रमी विजय मिळाला आहे. हा विकासवादाचा विजय आहे. गुजरातचा भव्य आणि ऐतिहासिक विजय हा सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या मूळ मंत्रांचा परिणाम आहे. हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. ज्याप्रकारे त्यांनी गुजरातसह देशातील जनतेची सेवा केली. त्याच निकालाचा परिणाम दिसून येत आहे. गरिबांसाठी दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था, वीज, शौचालय, सिलिंडरची व्यवस्था करण्याच्या धोरणामुळे आमचा विजय झाला, असं जे.पी.नड्डा म्हणाले.


हेही वाचा : गुजरातमधील ऐतिहासिक विजयावर मोदींची प्रतिक्रिया; कार्यकर्त्यांना म्हटले ‘रिअल चॅम्पियन

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -