घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातमधील ऐतिहासिक विजयावर मोदींची प्रतिक्रिया; कार्यकर्त्यांना म्हटले 'रिअल चॅम्पियन'

गुजरातमधील ऐतिहासिक विजयावर मोदींची प्रतिक्रिया; कार्यकर्त्यांना म्हटले ‘रिअल चॅम्पियन’

Subscribe

भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत यंदा ऐतिहासित विजय मिळवला आहे. भाजपने आपल्या होमपिचवर सलग सातव्यांदा मिळवलेल्या विजयाबद्दल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भाजपने गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवत सर्व विक्रम मोडीत काढले. गुजरातमध्ये भाजपने 155 हून अधिक जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळताना दिसत आहे.

यावर मोदींनी ट्विट करत म्हटले की, धन्यवाद गुजरात, अभूतपूर्व निवडणूक निकालांनी मी भारावून गेलो आहे. विकासाच्या राजकारणाला जनतेने आशीर्वाद दिला आहे. हे निकाल दर्शवतात की, त्यांना ही गती अधिक वेगाने चालू ठेवायची आहे. मी गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो.

- Advertisement -

मोदींनी कार्यकर्त्यांना ट्विट करत म्हटले की, मी भाजपाच्या सर्व मेहनती कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुमच्यापैकी प्रत्येकजण चॅम्पियन आहे. आमच्या पक्षाची खरी ताकद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या विलक्षण मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य झाला नसता.

- Advertisement -

तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून गुजरातमधील भाजपच्या विजयाबद्दल गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. गुजरातमध्ये भाजपच्या दणदणीत विजयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. शहा म्हणाले की, जनतेने मोफत आणि तुष्टीकरण आणि पोकळ आश्वासने नाकारून भाजपला ऐतिहासिक जनादेश दिला आहे.

हे नरेंद्र मोदींच्या विकास मॉडेलवर जनतेचा अढळ विश्वास दर्शवते, असे ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केले. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींनी विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आज गुजरातच्या जनतेने भाजपला आशीर्वाद दिला असून विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.


हिमाचलमध्ये 11 पैकी 9 विद्यमान मंत्र्यांचा पराभव, मुख्यमंत्री अन् ऊर्जामंत्र्यांनी आब राखली

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -