घरदेश-विदेशअखेर न्या. विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा मंजूर

अखेर न्या. विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा मंजूर

Subscribe

६ सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती अधिसूचनेत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता व्ही. कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मेघालय उच्च न्यायालयात केलेली बदली रद्द करण्यास नकार दिल्याने मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामानी यांनी मुख्य न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला होता. अखेर विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती सरकारी अधिसूचनेत देण्यात आली आहे. ६ सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती अधिसूचनेत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता व्ही. कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वकिलांची निदर्शने

मद्रास उच्च न्यायालयातून विजया ताहिलरामानी यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात चेन्नई व महाराष्ट्रात वकिलांनी निदर्शने केली. १२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, सयुक्तिक कारणे देऊनच मुख्य न्यायाधीशांची बदली केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव संजीन काळगावकर म्हणाले होते की, संस्थेच्या हितास बाधा येऊ नये म्हणून मुख्य न्यायाधीशांच्या बदलीची कारणे उघड केली जात नाहीत. पण जर परिस्थितीमुळे तसे करावे लागले तर ही कारणे न्यायवृंदाकडून उघड केली जाऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – कलम ३७० हटवण्याला विरोध करणं काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्लज्जपणा – अमित शहा

पुढील वर्षी निवृत्त होणार होत्या

बदलीच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर विजया ताहिलरामानी यांनी ६ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांनी हा राजीनामा पाठवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राजीनाम्याची प्रत पाठवली होती. गोगोई यांनी ताहिलरामानी यांच्या बदलीची शिफारस केली होती. दरम्यान ८ ऑगस्ट २०१८ रोजी ताहिलरामानी यांना बढती देऊन मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमण्यात आले होते. २६ जून २००१ रोजी विजया ताहिलरामानी यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले होते. २ ऑक्टोबर २०२० रोजी विजया ताहिलरामानी निवृत्त होणार होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -