घरदेश-विदेशNEET Result 2018 नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा राज्यात पहिला

NEET Result 2018 नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा राज्यात पहिला

Subscribe

नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा आशिष अग्रवाल देशात ७ वा तर महाराष्ट्रात पहिला आला आहे. तर बिहारची कल्पना कुमारी ऑल इंडिया रँकमध्ये ९९.९९ टक्के गुणांसह नीट परीक्षेत देशात पहिली आली आहे. कल्पनाने ७२० पैकी ६९१ गुण मिळवले असून तिला फिजिक्समध्ये १८० पैकी १७१, केमिस्ट्रीत १८० पैकी १६० तर बायोलॉजीत ३६० पैकी ३६० गुण मिळाले आहेत.

आज नीट परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या cbseneet.nic.in. या वेबसाइटवर हे निकाल पाहता येणार आहेत.

- Advertisement -
  • यंदा १६ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
  • त्यातील ७ लाख १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
  • नीट परीक्षेचा निकाल ५० टक्के लागला
  • ५ जूनला लागणार होता निकाल, मात्र एक दिवस आधीच जाहीर
  • परीक्षेसाठी देशभरातील १३६ शहरांमध्ये २२५५ केंद्र होते

सीबीएसईने यावर्षी ७ मे २०१८ रोजी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) च्या परीक्षांचे आयोजन केले होते. देशातील सर्व मेडिकल आणि डेंटल महाविद्यालयांमधील एमबीबीएस तसेच बीडीएसच्या प्रवेशासाठी ही एक सिंगल विंडो परीक्षा घेतली जाते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -