घरदेश-विदेशशोपियानमध्ये पोलीस गाडीवर ग्रेनेड हल्ला; एका मुलीचा मृत्यू

शोपियानमध्ये पोलीस गाडीवर ग्रेनेड हल्ला; एका मुलीचा मृत्यू

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना लक्ष्य केलंय. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला केला. बाटपोरा येथून जात असताना पोलिसांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झालाय. तर चार पोलिसांसह १६ जण जखमी झाले. जखमींवर शोपिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील एक विद्यार्थी आणि महिलेची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी श्रीनगरला हलवण्यात आले आहे.

ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू, १६ जखमी

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दहशतवाद्यांनी शोपियां शहरामध्ये पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर १२ नागरिक आणि ४ पोलीस जखमी झाले. पोलिसांची एक गाडी बाटपोरा येथून जात असताना त्यांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबारसुद्धा केला. या हल्ल्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

चार दिवसामध्ये १४ ग्रेनेड हल्ले

गेल्या चार दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरमध्ये १४ ग्रेनेड हल्ले केले. जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मागच्या आठवड्यात सुरक्षारक्षक आणि नेत्यांवर ग्रेनेड हल्ला केला. त्याआधी दहशतवाद्यांनी रविवारी पुलवामामध्ये अब्दुल रशीद यांच्या घराबाहेर बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर त्यांनी पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे जवानांच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला केला. मात्र या हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झाले नाही. २ मे रोजी दहशतवाद्यांनी श्रीनगरला लक्ष्य केलं. एकाच दिवशी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी चार ठिकाणी हल्ले केले. फत्तेकदल, बादशाह ब्रिज, बटमालू आणि मोमिनाबादमध्ये ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात ४ नागरिक आणि ४ जवान जखमी झाले होते.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -