घरताज्या घडामोडीसूड घेण्यासाठी कोरोनाग्रस्ताने घेतली अधिकाऱ्याची 'पप्पी'

सूड घेण्यासाठी कोरोनाग्रस्ताने घेतली अधिकाऱ्याची ‘पप्पी’

Subscribe

सूड घेण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकाऱ्याला पप्पी दिल्याची घटना समोर आली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याचा एका वेगळ्या पद्धतीने बदला घेतल्याची घटना समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याची पप्पी घेऊन आपला सूड घेतला आहे. मात्र, यात धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तींने पप्पी घेतली तो व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. पप्पी घेतल्यानंतर या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याला आपण कोरोनाबाधित असल्याचे सांगितले. यामुळे हादरलेल्या अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले. ही घटना कराची येथील असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

कराची महापालिकेमध्ये कामाला असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ५ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले होते. या कर्मचाऱ्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने त्याच्याविरोधात ही करावाई करण्यात आली होती. त्यामुळे निलंबित झाल्यापासून या कर्मचाऱ्याला पगार मिळणे देखील बंद झाले होते. त्यामुळे तो वैतागला होता. अखेर त्यांनी याचा बदला घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या संचालकांना मिठी मारली आणि त्यांनी पप्पी घेतली. मात्र, पप्पी घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्याला आपण कोरोनाग्रस्त असल्याचे सांगितले. हे कळताच अधिकाऱ्याला धक्काच बसला.

- Advertisement -

अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना भेटला

हा अधिकारी वरिष्ठ अधिकारी केवळ त्याच्या सहकाऱ्यांना पप्पी देऊन थांबला नाही. तर त्यांनी महापालिकेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, ज्यावेळी हा कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे कळले त्यावेळी पालिकेच्या इमारतीत एकच खळबळ उडाली. दरम्यान, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याची भेट घेतली होती त्यांनी तात्काळ कार्यालय सोडले.


हेही वाचा – कंडोमच्या जाहिराती या Porn चित्रपटासारख्या – हायकोर्ट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -