घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांसोबतच्या बैठकीआधी पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी करणार चर्चा

शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीआधी पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी करणार चर्चा

Subscribe

शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीआधी गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले.

केंद्रीय कृषी कायद्या विरोधात दिल्लीतील बॉर्डरवर शेतकरी जमले आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. आज (शनिवारी) शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्र्यांची एक मोठी बैठक होत आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित आहेत. तसेच केंद्रीय मंत्री पियूष गोयक देखील या बैठकीत पोहोचले आहेत.

बैठकीआधी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, आज दुपारी २ वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. मला खात्री आहे की, शेतकरी सकारात्मक विचार करतील आणि आपले आंदोलन मागे घेतली. यादरम्यान शेतकरी महापंचायत नेते रामपाल जाट म्हणाले की, ‘सरकारने तीन काळे कायदे रद्द करण्याची घोषण केली पाहिजे आणि लेखी स्वरुपात द्यायला पाहिजे की, एमएसपी जारी राहिल. जर आजच्या बैठकीत काही सकारात्मक निर्णय झाला नाही, तर राजस्थानाचे शेतकरी एनएच-८ सोबत दिल्लीसोबत आंदोलन करतील आणि जंतर मंतरवर निर्देशन करतील.’

- Advertisement -

सध्या शेतकरी कृषी कायद्या विरोधातील मागणीवर ठाम आहे. शेतकऱ्यांना एमएसपीसंदर्भात ठाम विश्वास हवा आहे. पण केंद्र सरकार तीनही कृषी कायदे मागे घेणे मान्य करत नाही आहेत. पण शेतकऱ्यांच्या काही मागण्या सरकार मान्य करताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे सध्या चिल्ला बॉर्डर (दिल्ली-नोएडा लिंक रोड)वर आंदोलन सुरू आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, ‘जर सरकारसोबतच्या चर्चेत आज काही निर्णय झाला नाही तर संसदेला घेराव घालू. गेल्या नऊ दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात दिल्ली बॉर्डवर आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत केंद्र सरकारसोबत दोन वेळा चर्चा झाल्या आहेत. पण आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय झाल्याचे समोर नाही आले नाही आहे.’


हेही वाचा –  संजय राऊतांनी दिली डिस्चार्जनंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -