घरताज्या घडामोडीकाय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो...; अजितदादांचा...

काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो…; अजितदादांचा बावनकुळेंना टोला

Subscribe

मी उद्या मुंबईला जाणार आहे. माझ्या कार्यक्रमाची पाहाणी करून नागपूरला जातो आणि बावनकुळे यांची भेट घेतो किंवा ते मुंबईला येणार असतील तर भेटतो आणि काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो? कसं काम केले नाही तर पक्ष तिकिट नाकारतो? आपल्यालाही नाकारतो पत्नीलाही नाकारतो.

‘माझ्या कार्यक्रमाची पाहाणी करून नागपूरला जातो आणि बावनकुळे यांची भेट घेतो किंवा ते मुंबईला येणार असतील तर भेटतो आणि काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो? कसं काम केले नाही तर पक्ष तिकिट नाकारतो? आपल्यालाही नाकारतो पत्नीलाही नाकारतो’, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले. (NCP Leader Ajit Pawar Slams Chandrashekhar Bawankule)

‘मी उद्या मुंबईला जाणार आहे. माझ्या कार्यक्रमाची पाहाणी करून नागपूरला जातो आणि बावनकुळे यांची भेट घेतो किंवा ते मुंबईला येणार असतील तर भेटतो आणि काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो? कसं काम केले नाही तर पक्ष तिकिट नाकारतो? आपल्यालाही नाकारतो पत्नीलाही नाकारतो. या सगळ्याची माहिती त्यांच्याकडून घेतो आणि त्यांचा मोलाचा सल्ला माझ्या बुद्धीला पटला तर, तशापद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो’, अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

‘नुसते पोस्टर लावून कोणीही मुख्यमंत्री होत नसते. मुख्यमंत्री होण्यासाठी 13 कोटी जनतेचे विश्वास जिंकावे लागते. जनतेचे मन तयार करावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार असताना कधीच विकासावर चर्चा केली नाही. विकासावर कोणतेही काम केल नाही. महाराष्ट्र मागे आणण्याचे काम केले. त्यामुळे पोस्टर लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही’, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

- Advertisement -

जयंत पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो – अजित पवार

पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले होते. त्याच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी ‘जयंत पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो आणि त्यांचे म्हणणे खरं ठरो’, असे मिश्किल उत्तर दिले.


हेही वाचा – बारसु रिफायनरीबाबत अजित पवार म्हणाले; ‘प्रकल्पाला विरोध नाही पण…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -