घरदेश-विदेशलोकांना दुखावल्याची कुमारस्वामींना उपरती

लोकांना दुखावल्याची कुमारस्वामींना उपरती

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्यावेळी एक खळबळजनक विधान केले होते. कर्नाटकमधील जनतेच्या भावना दुखवतील असे वक्तव्य केल्यामुळे कुमार स्वामींवर भाजपकडून जोरदार टीका देखील झाली होती. दरम्यान याचप्रकरणी दिल्लीमध्ये बोलत असताना, ‘त्यावेळी केलेल्या विधानामागे आपला जनतेला दुखावण्याचा हेतू नव्हता’, असे कुमारस्वामी यांनी जाहीरपणे सांगितले. नुकतीच स्वामी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली.

काय होते ‘ते’ विधान?

‘आज आपण जे आहोत ते काँग्रेसच्या कृपेने आहोत. लोकांचे त्यामध्ये काहीच योगदान नाही. निवडणुकांच्या काळात मी लोकांकडे जनादेश मागितला होता. मात्र, त्यांच्याकडून तो मिळाला नाही’, अशाप्रकारचे विधान कुमारस्वामींनी कर्नाटक निवडणूकांच्यावेळी केले होते. ‘माझ्या पक्षाला बहुमत मिळालं नाही याचाच अर्थ कर्नाटकच्या लोकांनी मला आणि माझ्या पक्षाला नाकारलं. पूर्ण बहुमत देण्याच्या मागणीला त्यांनी नाकारलं. केवळ मी काँग्रेस पक्षाच्या कृपेमुळेच मी निवडून आलो’, असंही स्वामी म्हणाले होते. या विधानांमुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

- Advertisement -

‘शेतकऱ्यांची कर्जमाफी.. माझे प्राधान्य’

कुमार स्वामींनी नुकतीच दिल्लीमध्ये जाऊन मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ”निवडणुकीच्या काळादरम्यान मी शेतकरी नेत्यांची वक्तव्यं ऐकली. त्यांनी मला किती पाठिंबा दिला हे देखील मी पाहिले. मात्र, असे असले तरीही शेतकरी कर्जमाफीबद्दलचं माझं धोरण स्पष्ट आहे”, असेही कुमारस्वामी  म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला माझे कायमच प्राधान्य राहील असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -