घरUncategorized१६ दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलने दिला दिलासा

१६ दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलने दिला दिलासा

Subscribe

गेल्या १५ दिवसांपासून सगळ्यांनाच पेट्रोल, डिझेलच्या चढ्या भावाने हैराण केले आहे. डिझेल आणि पेट्रोलचा दर आज किती असेल? अशी चिंता गेले काही दिवस देशवासीयांना सतावत असताना आज  पेट्रोल, डिझेलच्या दराने काहीसा  दिलासा दिला आहे. कारण१६ दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलच्या भावात घट झाली आहे पेट्रोल ६० पैसे प्रति लिटर तर डिझेल ५६ पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे.

३ रुपयांनी झाली होती वाढ

पेट्रोल आणि डिझेलचा दर गेल्या १५ दिवसांपासून ३ रुपयांनी वाढला आहे. मंगळवारी पेट्रोलचा दर साधारण ८६.२८ रुपये लीटर इतका होता. तर डिझेल ७३.७६ इतका होता.

- Advertisement -


कर्नाटक निवडणुकांचा परिणाम ?

कर्नाटक विधानसभा निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. गेले १५ दिवस ही वाढ सुरुच आहे. कर्नाटक निवडणुकांच्या निकालांनंतर हा परिणाम असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे हे दर खाली कधी येणार याची सर्वसामान्यांना प्रतिक्षा होती. आज अखेर १६ दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलने सर्वसामान्यांना दिलाला दिला.

पेट्रोल, डिझेलचे आजचे रेटकार्ड (प्रती लिटर)
मुंबई- ८५.६५
दिल्ली-७७.८३
कोलकाता-८०.४७
चेन्नई-८०.८०

- Advertisement -

डिझेल (प्रति लिटर)
मुंबई- ७३.२०
दिल्‍ली – ६८.७५
कोलकता – ७१.३०
चेन्‍नई – ७२.५८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -