घरदेश-विदेशकर्नाटक निवडणुकीत काँग्रेस ठरला 'बाजीगर', ७८ जागांवर विजयी

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस ठरला ‘बाजीगर’, ७८ जागांवर विजयी

Subscribe

‘हार कर जितने वाले को बाजीगर कहते है’ या प्रमाणे कर्नाटक निवडणुकांमध्ये पिछाडीवर असलेला काँग्रेस पक्ष, अंतिमतः जेडीएस सोबत संगनमत करुन बाजीगर ठरला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला १०७ जागा मिळवण्यात यश मिळाले असून, भाजप सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला. भाजप पाठोपाठ काँग्रेसला ७८ जागा, जनता दल सेक्युलर पक्षाला ३७ तर इतर पक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही काँग्रेस पक्ष जेडूएसशी आघाडी करुन सत्ता स्थापन करण्यास यशस्वी होणार असल्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमध्ये १२ मे रोजी विधानसभेच्या एकूण २२२ जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये एकूण ४ कोटी ९६ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

सकाळी आठच्या सुमारास कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली. मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही काळातच भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र दुपारनंतर भाजपने आपला जोर कायम ठेवत काँग्रेसला मागे टाकले. दरम्यान जेडीएस पक्षाने सुरुवातीला धिम्या गतीने सुरुवात केली असली, तरीही दुपारनंतर वेग पकडत काँग्रेसच्या जागांवर ताबा मिळवला.

- Advertisement -

काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आली असून, आजच या दोन्ही पक्षाच्या सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला. त्यामुळे कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगणार का? की भाजप सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार हे आता औत्सुक्याचे ठरेल.

ममता दीदींनी दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जींनी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसची आघाडी झाली असती तर निकाल वेगळे असते, असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

 

बीएस युेडियुरप्पांना देव पावला!

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा हे शिकारपूर क्षेत्रातून विजयी ठरले आहेत. मतमोजणी सुरु होण्यापूर्वी येडियुरप्पांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे अखेर त्यांना देव पावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पियुष गोयल देणार मेजवानी

कर्नाटक निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळण्याचे चित्र आहे. कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या यशासाठी नुकतेच वृत्तमंत्री पदाचा कारभार संभाळणारे पियुष गोयल यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मेजवानीसाठी बोलावले.

कर्नाटकमधील पहिला निकाल जाहीर

दक्षिण कन्नडातील मुदबिद्री  जागेवर भाजपाचा पहिला विजय झाला असून, भाजप कार्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.

 

भाजपचे उमेद्वार येडियुरप्पा देवाचरणी

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी आज सकाळी मतमोजणी पूर्वी देवाचे दर्शन घेतले. या निवडणूकीचा निकाल हा आपल्या बाजूने लागावा अशी प्रार्थना त्यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -