घरदेश-विदेशकर्नाटक डर्टी पॉलिटिक्स; पुढाऱ्यांऐवजी अभिनेत्री टॉप ट्रेंडिग

कर्नाटक डर्टी पॉलिटिक्स; पुढाऱ्यांऐवजी अभिनेत्री टॉप ट्रेंडिग

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तिथे नाट्यमय घटनाक्रम सुरु आहे. शनिवारी विधानसभेमध्ये बहुमत चाचणी आधी जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांची पत्नी राधिका कुमारस्वामी गुगलवर ट्रेंड करु लागली. राधिका कुमारस्वामी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माता म्हणून ओळखली जाते. २००६ मध्ये राधिका यांनी एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत विवाह केला होता. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव शमिका के. स्वामी आहे. कुमारस्वामी हे त्यांची पत्नी राधिकामुळे अनेक वेळा चर्चेत आले आहेत.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल आल्यानंतर ‘Karnataka Election 2018’ हा हॅशटॅग लागोपाठ टॉप ट्रेंडमध्ये आहे. त्यामध्ये राधिका कुमारस्वामी सुध्दा टॉप ट्रेंडमध्ये आली. लोकं राधिका कुमारस्वामीला सर्च करु लागले आहेत आणि तिच्या संदर्भातील माहिती गुगलवर शोधण्याचा प्रयत्न करु लागले.

- Advertisement -

कोण आहे राधिका ?
राधिका कुमारस्वामी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माता म्हणून ओळखली जाते. राधिका १४ वर्षाची असल्यापासून कन्नड फिल्म इंडस्ट्रिमध्ये काम करत आहे. ‘नीला मेघा शर्मा’ हा राधिकाचा पहिला चित्रपट आहे. राधिकाने ३० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे. त्याचप्रमाणे तिने काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. २०१२ मध्ये तिने ‘लकी’ हा कन्नड चित्रपटाची निर्मिती केली होती.

राधिकाचा कुमारस्वामीसोबत दुसरा विवाह –
राधिकाचे पहिले लग्न रतन कुमार याच्यांसोबत झाले होते. मात्र त्याचे लग्नानंतरचे जीवन वादविवादात गेले. रतन कुमार याने राधिका १४ वर्षांची असताना तिच्याशी जबरदस्ती लग्न केले असल्याचा आरोप राधिकाच्या आईने केलाय. तसेच राधिकाच्या नवऱ्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न सुध्दा केल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केलाय. त्यानंतर २००२ मध्ये रतन कुमार याचे हार्ट अटॅकने निधन झालं. त्यानंतर राधिका बऱ्याचवर्ष प्रकाशझोतातून दूर राहिली. त्यानंतर २००६ मध्ये राधिकाने एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न केलं.

- Advertisement -

कुमारस्वामी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत –
कर्नाटकचे राजकारण एक वेगळ्या वळणावर आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे जनता दलाचे नेते कुमारस्वामी सध्या चर्चेत आहेत. कुमारस्वामी त्यांच्या राजकिय नेतृत्वामुळे चर्चेत नाही तर ते त्यांच्या खासगी जीवनावरुन चर्चेत आहेत. कुमारस्वामी त्यांच्या खासगी जीवनावरुन पहिल्यांदाच नाही तर अनेकदा चर्चेत आले आहेत. याआधी कुमारस्वामी यांच्या विवाहावरुन वाद झाले आहेत. कुमारस्वामी आणि राधिका यांच्या लग्नामध्ये अनेक कायदेशीर अडचणी होत्या. कदाचित हेच कारण असावे, की कर्नाटक निवडणुकी दरम्यान सोशल मीडियावर यावेळी त्यांची पत्नी राधिका ट्रेंड होत आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -