घरदेश-विदेशमहिलेसोबत हॉटेलमध्ये पकडले गेल्याने मेजर गोगाईचे कोर्ट मार्शल

महिलेसोबत हॉटेलमध्ये पकडले गेल्याने मेजर गोगाईचे कोर्ट मार्शल

Subscribe

एका १८ वर्षीय तरुणी सोबत त्यांना पोलिसांनी हॉटेलमध्ये पकडले होते.

२३ मार्च २०१८ ला सेनेचे अधिकाऱ्याला पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणी सोबत हॉटेलमध्ये पकडले होते. त्या तरुणी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी त्या तरुणीला हॉटेलमध्ये आणले होते. हे प्रकरण तेंव्हा जास्त चर्चेत आले जेव्हा काळाले की पकडण्यात आलेले आधिकारी हे लीतुल गोगाई आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर कोर्ट मार्शलची कारवाई करण्यात आली. मात्र या प्रकरणतील त्या तरुणीने आपण स्वखुशीने त्यांच्या सोबत हॉटेलमध्ये गेल्याचे सांगितले. गोगोई यांच्या सोबत फेसबूक द्वारे या तरुणीशी मैत्री झाली होती. या प्रकरणी दोषी आढळ्यास गोगोई यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे या प्रकरणा नंतर आर्मीचे आधिकारी बिपीन रावत यांनी सांगितले होते.

तरुणाला गाडीला बांधल्याने आले होते चर्चेत

२०१७ मध्ये जम्मू काश्मिरच्या बडगामा जिल्ह्यात डयुटीवर असताना दगडफेक झाली. या दगडफेक करणाऱ्या लोकांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी
तेथील एका काश्मिरी तरुणाला आपल्या गाडी समोर बांधले. या प्रकरणामुळे त्यावेळी ते चर्चेत आले होते. या तरुणाला त्यांनी जवळपास ६ तास आपल्या गाडी समोर बांधुन अजुबाजुच्या गावांमध्ये बांधले. जमावा पासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला त्याला गाडी समोर बांधावे लागले असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. राष्ट्रीय रायफल ५३ सेक्टरमध्ये ते सेना अधिकारी म्हणून तैनात होते.

- Advertisement -

हे आहेत आरोप

दरम्यान, या प्रकरणी गोगाई यांच्यावर अभियान सुरु असताना देखील सीमाक्षेत्राच्या बाहेर जाण्याची परवानगी नसताना देखील सीमे बाहेर गेल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच सौन्यात असताना देखील बाहेरील महिले सोबत मौत्री तसेच संबंध ठेवण्याचा आरोप ठेवण्यात आला. सदर प्रकरणामुळे त्यांच्या पदोन्नती रोखली तसेच पदावरुन त्यांना पाय उतार केले जाण्याची कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -