घरट्रेंडिंगvideo : खतरनाक कोबरा ठरला काळ? सर्पमित्र वावा सुरेशच्या स्नेक बाईटचा...

video : खतरनाक कोबरा ठरला काळ? सर्पमित्र वावा सुरेशच्या स्नेक बाईटचा थरार कॅमेरात कैद

Subscribe

सुरेश यावेळी कुरीची येथील एका गावात घुसलेला कोबरा पकडण्यासाठी गेला होता. सोमवारी संध्याकाळी ४:३०वाजताच्या सुमारास साप पकडताना अचानक सापाने सुरेशच्या उजव्याला दंश केला.

केरळमधील प्रसिद्ध स्नेक कॅचर ( सर्प मित्र ) (Kerala Snake Catcher) वावा सुरेशला (vava suresh)  कोबरा हा विषारी आणि सर्वात खतरनाक समजला जाणारा कोबरा साप ( cobra snake)  चावल्याची धक्कादायक घटना घडली. सर्पदंश झाल्यानंतर वावा सुरेशला कोट्टायम रुग्ण्लायात दाखल करण्यात आले असून सुरेशची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. केरळचे कॉरपोरेशन अँड रजिस्ट्रेशन मंत्री वीएन वासवन यांनी रुग्णालयात सुरेशची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णालयात सुरेशसाठी मोठ्या आरोग्य यंत्रणेची व्यवस्था केली आहे. सुरेशला याआधी अनेक साप चावले होते मात्र खतरनाक कोबरा सुरेशसाठी जिवघेणा ठरला.

- Advertisement -

उजव्या पायाला केला दंश

सुरेश यावेळी कुरीची येथील एका गावात घुसलेला कोबरा पकडण्यासाठी गेला होता. सोमवारी संध्याकाळी ४:३०वाजताच्या सुमारास साप पकडताना अचानक सापाने सुरेशच्या उजव्याला दंश केला. साप चावताच सुरेश जमिनीवर कोसळला त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशची प्रकृती सध्या गंभीर आहे.

सर्पमित्र वावा सुरेशच्या स्नेक बाईटचा थरारक व्हिडीओ पाहा

- Advertisement -

अनेकदा झालाय सर्पदंश

वावा सुरेश हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध सर्पमित्र आहे. ४८ वर्षीय सुरेशने आजवर ५० हजारांहून अधिक साप पकडले आहेत. २०२०मध्ये त्याने पिट वायपर सापाने दंश केला होता. होताच्या अंगठ्याला दंश केल्याने सुरेश काही वेळासाठी बेशुद्ध झाला होता. आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. ७२ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्याला सोडण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जवळपास २.८ मिलियन भारतीयांना दरवर्षी सर्पदंश होतो. ज्यात ४६ हजार भारतीयांचा मृत्यू होतो. तर लाखो लोक अपंग होतात.


हेही वाचा – Budget 2022 memes : अर्थसंकल्प झाला सादर अन् जनता बोलते, क्या करु मै मर जाऊं…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -