घरदेश-विदेशपुरानंतर केरळमध्ये घडतंय काहीतरी भलतंच!

पुरानंतर केरळमध्ये घडतंय काहीतरी भलतंच!

Subscribe

जुलै महिन्यात केरळमध्ये आलेल्या भीषण पूरस्थितीनंतर आता केरळसमोर नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. केरळमधील नद्या-नाल्यांमधला पाणीसाठा अचानक आटू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होते की काय? असा प्रश्न केरळवासियांसमोर निर्माण झाला आहे.

जुलै महिन्यात केरळमध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळ राज्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचंही समोर आलं आहे. या दरम्यान देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात आलेल्या आर्थिक आणि इतर मदतीच्या जोरावर केरळ पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी सज्ज झालं आहे. एकीकडे केरळमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असताना दुसरीकडे केरळमध्ये पूर ओसरल्यानंतर भलतंच काहीतरी घडायला लागलं आहे. पूर काळामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दृश्य दिसल्यानंतर आता केरळमध्ये तेच पाणी आटायला लागलं आहे! केरळमधील नद्या, नाले, तलाव अशा पाण्याच्या स्रोतांमधल्या पाण्याची पातळी आपोआपच घटू लागली आहे. स्वत: केरळच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून संबंधित यंत्रणांना त्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नद्या अचानक पडतायत कोरड्या ठाक!

जुलै महिन्यात केरळच्या विविध भागांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली. इडुक्की आणि वायनाड या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये घरं आणि आसपासचा परिसर बुडाला होता. ही पूरस्थिती आणि त्यानंतर आलेल्या आजारपणामुळे सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ४९१ बळी गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर केरळ सरकार आत्ता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच केरळ सरकारपुढे एक नवीन पेच निर्माण झाला आहे. पेरियार, भरतापुळा, पाम्पा आणि कबनीसारख्या केरळमधील महत्त्वाच्या नद्या आणि त्यांना जोडणारे नाले अचानक आटू लागले आहेत. या जलस्रोतांच्या पाणी पातळीमध्ये अचानक घट होऊ लागली आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – केरळ पूरग्रस्तांना मदत करा! न्यायमूर्तींची आरोपींना शिक्षा!


शेतकऱ्यांचीही चिंता वाढली

पाण्यातील आर्दतेचे प्रमाण घटने, नद्यांच्या पाणीपातळीमध्ये अनपेक्षित घट, विहिरी अचानक कोरड्याठाक पडणे, भूमिगत पाणीसाठाही कमी होणे, गांडुळांची संख्या अचानक रोडावणे असे प्रकार केरळमध्ये आणि विशेषत: पूरग्रस्त भागामध्ये समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे केरळमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गांडुळांच्या घटत्या संख्येमुळे शेतकरी चिंतेत आले असून पाण्याची होणारी घट राज्य सरकारला चिंतेत टाकणारी आहे. या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने घेतली गंभीर दखल

विजयन यांनी राज्य विज्ञान परिषदेकडे या प्रकाराचा धांडोळा घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. पाण्यामध्ये अचानक घट का होऊ लागली आहे? याचा राज्याच्या पाणी पुरवठ्यावर काय परिणाम होणार आहे? त्यावर काय उपाययोजना योजता येईल? या सर्व बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन सध्या अमेरिकेमध्ये उपचार घेत असून तिथून त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. ‘पाणी व्यवस्थापन विभागाला यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून पाणी पातळीतील बदलांचा ते अभ्यास करणार आहेत’, असेही विजयन यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – केरळ पूर–मदतीच्या ७०० कोटींचा घोळ; भारतीय वंशाच्या व्यावसायिकामुळे गोंधळ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -