घरदेश-विदेशमहाप्रलयातून सावरल्यानंतर केरळमधील शाळा, महाविद्यालये सुरु

महाप्रलयातून सावरल्यानंतर केरळमधील शाळा, महाविद्यालये सुरु

Subscribe

महापूरानंतर केरळवासिय हळूहळू सावरत आहेत. केरळमधील शाळा आणि महाविद्यालय सुरु झाले आहेत.

केरळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे केरळचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. या महाप्रलयानंतर आता हळूहळू केरळचे जनजीवन पूर्व पदावर येत आहे. केरळमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. केरळमध्ये आलेल्या पूरा दरम्यान त्याठिकाणी असणाऱ्या शाळा, महाविद्यालयामध्ये पूरग्रस्तांच्या बचाव छावण्या राबवण्यात आल्या होत्या. त्याचसोबत ओणण सणाची शाळा सुट्टी विद्यार्थी आणि शिक्षकांना देण्यात आली होती.

१५ दिवसानंतर शाळा, महाविद्यालय सुरु

महाप्रलया दरम्यान केरळमधील शाळांचे मोठे नुकसान झाले होते. पूराचे पाणी शाळेत घुसून चिखल आणि कचरा साचला होता. पूराचे पाणी ओसरल्यानंतर आता केरळमधील सर्व शाळांची साफसफाई करण्यात आली. ६० हजारापेक्षा आधिक स्वयंसेवकांनी केरळमधील घरं, सार्वजनिक संस्थांची कार्यालये, शाळा, महाविद्यालय, मंदिर आणि रुग्णालयाची साफसफाई केली. केरळवासिय हळूहळू या पूरातून सावरत आहेत. १५ दिवसानंतर केरळमधील शाळा आणि महाविद्यालय सुरु झाले आहेत.

- Advertisement -

४५८ शाळा सुरु

केरळमधील अलाप्पूझा जिल्ह्यातील बऱ्याच शाळा आजही बंद आहेत. याठिकाणी असणाऱ्या शाळांमध्ये स्वच्छता मोहीम सुरु आहे. केरळच्या इडूक्की येथे महापूराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. याठिकाणच्या ४५८ शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तक सरकार देणार

केरळच्या पुरामुळे शाळांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या संपूर्ण घराचे पूरामुळे नुकसान झाले. त्याबरोबर त्यांचे शाळेचा गणवेश, पुस्तकं देखील पूरामध्ये वाहून गेले. नष्ट झालेली पुस्तके आणि विद्यार्थ्यांचे गणवेश राज्य सरकार विद्यार्थ्यांना पुरवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -