घरताज्या घडामोडीCORONA VIRUS: प्रवास इतिहास लपवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

CORONA VIRUS: प्रवास इतिहास लपवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

Subscribe

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवास इतिहास लपवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे.

करोनाने देशात शिरकाव केल्यानंतर आता केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. देशात करोनाचा शिरकाव हा परदेशातून आलेल्या लोकांमुळे झाला आहे. यावर आता केरळ प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवास इतिहास लपवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार जे लोक रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरतात किंवा काही लपवतात, हा गुन्हा आहे. जे लोक प्रभावित भागातून व देशातून परत येतात मात्र प्रवास इतिहास उघड करत नाहीत याला गुन्हा मानण्यात येईल. बाहेरुन येणारे प्रवासी करोना बाधीत असतील तर ते रोगाचा प्रसार करतील. म्हणून आम्ही त्यांना त्यांची ओळख सांगण्यासाठी आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगत आहोत. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी प्रवासी इतिहास जाहीर करणे हा गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे के.के. शैलजा यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – ‘त्या’ कुटुंबासोबत विमानातून प्रवास करणारे प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -