घरताज्या घडामोडीCorona Vaccine: जगभरात भारताने केल्या सर्वाधिक कोरोना लस बुक!

Corona Vaccine: जगभरात भारताने केल्या सर्वाधिक कोरोना लस बुक!

Subscribe

भारत जगातील सर्वाधिक कोरोना लस ऑर्डर करणार पहिला देश ठरला.

कोरोना व्हायरससोबत लढत असलेल्या भारतासहीत जगातील अनेक देशांनी यापासून वाचण्यासाठी लस संदर्भात भागीदारी केली आहे. काही देशात कोरोना लस पोहोचली आहे आणि लोकांना लस मिळण्यास देखील सुरुवात झाली आहे. भारताने १६० कोटी कोरोना लसीचे डोस ऑर्डर केले आहेत. त्यामुळे भारत जगातील सर्वाधिक कोरोना लस ऑर्डर करणार पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘जवळपास ८ लसीची चाचणी केली जात असून या लसी विकसित करण्याचे भारताने आश्वासन दिले आहे. भारतात सध्या ३ लसी वेगवेगळ्या चाचणीच्या टप्प्यात आहेत.’ लसी येण्यास अधिक काळ लागणार नाही आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारताला सर्वाधिक लसीचे डोस येथूनच मिळणार 

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे चाचणी करणाऱ्या ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकासोबत भारताने भागीदारी केली आहे. तसेच भारताला सर्वाधिक लसीचे डोस येथूनच मिळणार आहेत. भागीदारी अंतर्गत एस्ट्राजेनेकाच्या लसीचे ५० कोटी डोस भारताला मिळणार आहेत. माहितीनुसार, अमेरिकेने देखील एस्ट्राजेनेकाकडे इतके डोस बुकिंग केले आहेत. भारत आणि अमेरिका व्यतिरिक्त इतर युरोपियन देशांकडून ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाची लस जवळपास ४० कोटी डोस ऑर्डर केले आहेत.

- Advertisement -

भारताने या कंपन्यांना अजूनही लसीचे ऑर्डर दिली नाही 

नोवावॅक्सने देखील कोरोना लस विकसित केली आहे. यांच्यासोबत भागीदारी अंतर्गत भारताने बिलियन डोसची ऑर्डर केली आहे. तर भारताने रशियाची कोरोना लस ‘स्पूतनिक व्ही’चे १० कोटी डोससाठी भागीदारी केली आहे. माहितीनुसार या लसीचे अंतिम चाचणी भारतात सुरू आहे. हैदराबादची डॉ.रेड्डीसोबत चाचणीसाठी ‘स्पूतनिक व्ही’ने समझोता केला आहे. ११ ऑगस्टला रशियाने ही लस विकसित करण्याचा दावा केला होता. पण आतापर्यंत भारता व्यतिरिक्त कोणत्याही देशांनी या लसीची ऑर्डर दिली नाही आहे. रशियाच्या गामालेया इन्स्टिट्यूटने ‘स्पूतनिक व्ही’ लस विकसित केली आहे. याशिवाय लस विकसित करणाऱ्या कंपनी सनोफी-जीएसके, फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्नाला आतापर्यंत भारताने कोणतीही ऑर्डर दिली नाही आहे. लसीचा पुरवठा करण्यापूर्वी कंपन्यांना लसीला जागतिक स्तरावर मंजूरी मिळायला पाहिजे. यानंतर कंपनी आपली लस पुरवठा करू शकतो.


हेही वाचा – गुडन्यूज! कोरोना लसीला वर्षाच्या अखेरीस मिळणार मंजूरी – AIIMS

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -