घरताज्या घडामोडीकोविड-१९ सारखाच १९७७ पसरला होता 'रशियन फ्लू'; व्हायरसने घेतले होते ७ लाख...

कोविड-१९ सारखाच १९७७ पसरला होता ‘रशियन फ्लू’; व्हायरसने घेतले होते ७ लाख बळी

Subscribe

जगभरात अजूनही कोरोना व्हायरस कहर कायम आहे. दीड वर्ष होऊनही कोरोना व्हायरसवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले नाही. कोरोना काळाच्या सुरुवातीपासून वैज्ञानिक संशोधन करत आहेत की, कोरोनाचा उगम नक्की कुठून झाला? काहींनी चीनच्या मटण बाजारातून कोरोना पसरल्याचे सांगितले. तर काही जणांनी चीनच्या एका प्रयोगशाळेतून पसरल्याचे सांगितले. अशा प्रकारे काहींनी वर्षापूर्वी व्हायरसचा मानवामध्ये फैलाव झाला होता. अजूनही या व्हायरसबाबत अनुमान लावले जात आहेत. १९९७ साली ‘रशियन फ्लू’ (H1N1) पसरला होता, ज्यामुळे जगभरातील ७ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

१९७७ मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनने पहिल्यांदा या व्हायरससंदर्भात अहवाल दिला होता, त्यामुळे ‘रशियन फ्लू’ म्हणून या व्हायरस ओळखले जाते होते. हा व्हायरस मानवी इन्फ्लूएंजा H1N1 व्हायरसमुळे झाला होता, जो पहिल्यांदा १९१८ साली ‘स्पॅनिश फ्लू’ महामारी दरम्यान समोर आला होता.

- Advertisement -

त्यावेळी असे मानले जात होते की, एका प्रयोगशाळेतील गळतीपासून ‘रशियन फ्लू’ पसरण्यास सुरुवात झाली. H1N1 म्हणजेच रशियन फ्लू व्हायरसचा मानवी इन्फ्लूएंजा व्हायरसशी जवळचा संबंध असल्याचे आढळले होते. या व्हायरसचा १९४९ ते १९५० दरम्यान प्रसार झाला होता. व्हायरस हा नेहमी वेगवेगळे रुप धारण करत असल्याचे सगळ्यांच माहित आहे. दरम्यान २०व्या शतकाच्या मध्याला व्हायरस जतन केलेले नमुने एका प्रयोगशाळेच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधला गेला, असे एका १९७८मध्ये झालेल्या शोधातील वैज्ञानिकांनी सांगितले आहे.

महामारीबाबत अनेक सिद्धांत आहेत. त्यापैकी एका सिद्धांतात असे आहे की, ‘एखाद्या प्राण्यांमध्ये व्हायरस हा गुप्त असतो. काही वैज्ञानिकांनी त्याला बदनाम केले आहे.’ दरम्यान रशियन फ्लू संदर्भात प्रयोगशाळेतील गळतीची माहिती मिळवण्यासाठी तीन दशके गेली. अजूपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकांनी या फ्लू संदर्भात पेपरद्वारे निर्णायक स्वरुपात सिद्ध केलेले नाही आहे.

- Advertisement -

कशी झाली या फ्लूला सुरुवात

जेव्हा १९१८मध्ये महामारी संपली, तेव्हा मानव इन्फ्लूएंजा H1N1 व्हायरसचा फैलाव पूर्णपणे थांबला नव्हता. जगभरात पसरला होता. सतत हा व्हायरस जिनोम बदल होता, म्हणजे रुप बदल होतो. (जसे की सध्या कोरोनाचे रुप बदलत आहे.) त्यानंतर १९५७ साली अजून एक मोठी महामारी आली ती म्हणजे ‘अशियाई फ्लू’. १२ वर्ष हा व्हायरस टिकून होता. पण १९६८मध्ये पुन्हा त्याने आपले डोके वर काढले. त्याला ‘हाँगकाँग’ व्हायरस असे ओळखले जात होते. यानंतर पुन्हा महामारी निर्माण झाली.

मग तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या सुदूर पूर्ण भागात आणि ईशान्य चीनच्या आसपास भागात १९७७मध्ये आणखी एक व्हायरस म्हणजे रशियन फ्लूचा उद्रेक झाला. पण यावेळी वैज्ञानिक हैराण झाले. कारण १९४९ ते १०५० मध्ये प्रसार झालेला H1N1 मानव इन्फ्लूएंजा व्हायरच्या जवळचा संबंध १९७७ मधल्या H1N1 व्हायरसमध्ये आढळला होतो.

जसे की, कोविड-१९ व्हायरस सतत आपले रुप बदल असल्यामुळे वेगवेगळे म्युटेशन निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे हा व्हायरस वेगवेगळ्या रुपात समोर येत होता. त्यामुळे नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग करणे खूप महत्त्वाचे आहे.

१९७८ साली नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अहवालात द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे वैज्ञानिकांच्या टीमला आढळले होते की, १९७७ सालच्या व्हायरसचे अनुवंशिक रुप हे १९५० च्या व्हायरसप्रमाणे होते. असे अनेक संशोधन अहवाल प्रत्येक वर्षाला समोर येत गेले. अनेकांचे म्हणणे होते की, व्हायरस प्राणी आणि पक्षांमुळे पसरला आहे.

२००६मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ‘स्थलांतरित पक्ष्यांनी पसरलेल्या इन्फ्ल्यूएंजा व्हायरस सायबेरियन तलावात जमला होता आणि तलावांचे विघटन झाल्यामुळे पुन्हा जुना व्हायरसचा प्रसार झाला असावा.’ परंतु २००८मध्ये अॅरिझोन विद्यापिठाच्या संशोधकांनी २००६चा अभ्यासात व्हायरसचे नमुने प्रयोगशाळेतील इतर नमुन्यांमुळे दूषित झाल्याचे दर्शविले. अखेर व्हायरसबाबत कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. २००८ पर्यंत वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेतील गळतीमुळे व्हायरस पसरल्याचे स्वीकारले. २०१५, १६मध्ये देखील या व्हायरसबाबत अभ्यास केला गेला. हा व्हायरस रशियाने जाणूनबजून पसरवल्याचा देखील दावा करण्यात आला होता. आजतागायत १९७७मध्ये झालेल्या व्हायरसच्या उद्रेकाबद्दल अनुमान लावले जात आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -