Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन ऋतिक रोशनने सिंटा(CINTAA)साठी केली 20 लाखांची मदत,5 हजार लोकांचे लसीकरण होणार फ्री

ऋतिक रोशनने सिंटा(CINTAA)साठी केली 20 लाखांची मदत,5 हजार लोकांचे लसीकरण होणार फ्री

अभिनेता या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करत आहे. कोविड -19 च्या पहिल्या लाटेत देखील, ऋतिकने सिंटा (CINTAA) साठी 25 लाखाची आर्थिक मदत केली होती

Related Story

- Advertisement -

ऋतिक रोशनने पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (CINTAA) सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऋतिकने असोसिएशनला 20 लाख रुपयांची देणगी दिली असून दारिद्र्य रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या 5 हजार सदस्यांना होणार आहे.या पुढकराविषयी ऋतिक रोशनचे आभार मानताना सिंटा (CINTAA)चे महासचिव, अमित बहल म्हणाले की, “ऋतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती. या वेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या 5000 सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे . देशभरात कोरोना व्हायरसची गंभीर स्थिति पाहता अनेक बॉलिवूड कलाकार लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेता हृतिक रोशन याने हॉलिवूड कलाकारासोबत मिळून देशासाठी कोरोना व्हायरसच्या लढाईत सहभाग घेतला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका अभियानाअंतर्गत 27 कोटी रुपये जमा केले होते.काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने हृतिकच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले होते.

- Advertisement -

अभिनेता या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करत आहे. कोविड -19 च्या पहिल्या लाटेत देखील, ऋतिकने सिंटा (CINTAA) साठी 25 लाखाची आर्थिक मदत केली होती, ज्यातून 4 हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती.मुंबई पोलिसांसाठी हँड सॅनिटाइजर्सपासून फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान देण्याबरोबरच कोविड -19 रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर आणि कंसेंट्रेटर्सपर्यंत, ऋतिक अनेक गरजू लोकांची सक्रियपणे मदत करत आहे.


हे हि वाचा – TheFamilyMan2 : रिलीज होण्याआधीच मनोज वाजपेयीने शेअर केली भावनिक पोस्ट

- Advertisement -