Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या घराबाहेर लावली नोटीस, मुलगा आशिषला क्राईम ब्रांचला बोलावले

Lakhimpur Kheri Violence uttar pradesh police pastes notice outside the residence of union minister ajay kumar
Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या घराबाहेर लावली नोटीस, मुलगा आशिषला क्राईम ब्रांचला बोलावले

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. आज याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. शुक्रवारपर्यंत उत्तर प्रदेश सरकारने याप्रकरणाचा सविस्तर अहवाल दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उत्तर प्रदेश पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आज गुरुवारी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनीच्या मुलाला शुक्रवारी क्राईम ब्रांचला बोलावले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्राच्या घरावर नोटीस चिकटवली असून लखीमपूर पोलिसांनी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना शुक्रवारी सकाळी १० वाजता क्राईम ब्रांचमध्ये बोलावले आहे.

यापूर्वी लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात आशिष पांडे आणि लव कुश या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांची चौकशी सुरू आहे. या घटनेत आशिष पांडे आणि लव कुश सामील होत आणि दोघे जखमी झाले होते. आयजी रेंज लक्ष्मी या दोन आरोपींची चौकशी करत आहेत.

आयजी रेंज लक्ष्मी सिंग म्हणाल्या की, दोन आरोपींना चौकशीसाठी बोलावले. दोघांच्या चौकशीमध्ये अनेक पुरावे मिळाले आहेत. घटनेत सामील असलेल्या तीन आरोपींची माहिती मिळाली असून यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनास्थळावरून खोके जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.


हेही वाचा – श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षक आणि मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या