घरदेश-विदेशललित मोदींकडून उत्तराधिकाऱ्याची घोषणा; व्यवसायाचा कारभार सोपवला मुलाच्या हाती

ललित मोदींकडून उत्तराधिकाऱ्याची घोषणा; व्यवसायाचा कारभार सोपवला मुलाच्या हाती

Subscribe

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या लंडनमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांना मागील दोन आठवड्यांपासून दोन वेळा कोरोना झाला आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन सपोर्ट ठेवण्यात आलंय. दरम्यान, अशातच आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ललित मोदी यांनी एक ट्वीट शेअर करत त्यांचा मुलगा रुचिर मोदीला त्यांच्या सर्व संपत्तीचा वारस म्हणून घोषित केलंय.

ललित मोदींनी केली निवृत्तीची घोषणा
ललित मोदींनी केके मोदी फॅमिली ट्रस्टची ललित मोदी ब्रांच मुलगा रुचिर मोदीला सोपवण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पत्रदेखील जारी केलं ज्यात त्यांनी लिहिलंय की, “मी माझ्या मुलीशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली. ललित कुमार मोदी कुटुंबाचा आणि केके मोदी फॅमिली ट्रस्टमधील जबाबदारी मी आता सोडली पाहिजे, असं तिलाही वाटतं. त्यामुळे मी मुलगा रुचिरला हे सगळं सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. वारस म्हणून तात्काळ त्याला हे सर्व अधिकार मिळतील. केके मोदी ट्रस्टचे यापुढचे सगळे व्यवहार एलकेएम फॅमिलीच्या वतीनं रुचिर पाहील. परंतु केके मोदी फॅमिली ट्रस्टचा एक विश्वस्त म्हणून मी पुढेही कायम राहीन.”

- Advertisement -

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या ट्रस्टवरून ललित मोदींची त्यांची आई वीणा मोदी, बहीण चारू यांच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू आहे. त्याचं पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. ललित मोदींनी पत्राचा फोटो ट्वीट करत लिहिलंय की, “ज्या परिस्थितीतून मी मागच्या काही दिवसांत गेलो. ते पाहता आता थांबण्याची वेळ आली आहे. मुलांनाही शिकण्याची संधी मिळायला हवी. त्यामुळेच मी त्यांना संपत्तीची जबाबदारी सोपवत आहे. आई आणि बहिणीच्या विरोधात सुरू असलेली माझी कायदेशीर लढाई खूप त्रासदायक झाली आहे. बऱ्याच काळापासून हा संघर्ष सुरू आहे. या संदर्भात तडजोडीसाठी अनेक वेळा चर्चाही झाली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. या सगळ्याचा मला प्रचंड मनस्ताप होत आहे. यापासून आता मला दूर राहायचं आहे,” असं ललित मोदींनी सांगितले.


हेही वाचा : ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे दिसणार एकत्र

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -