घरCORONA UPDATEकोरोना लहान मुलांची पाठ काही सोडेना; 46 टक्के मुलांना पोस्ट कोविडचा त्रास

कोरोना लहान मुलांची पाठ काही सोडेना; 46 टक्के मुलांना पोस्ट कोविडचा त्रास

Subscribe

अभ्यासानुसार, 3 वर्षांपर्यंतच्या 40 टक्के मुलांमध्ये दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ कोविडची लक्षणे होती, लॉन्ग कोविड 4 ते 11 वर्षे वयोगटातील 38 टक्के मुलांमध्ये विशेषत: लॉन्ग कोविडची लक्षणं दिसली

कोरोना संसर्गातून बरे तर होत आहेत मात्र बहुतांश जणांना त्याची काही लक्षणं अजूनही जाणवत आहेत. त्यामुळे कोरोना पूर्णपणे बरा होतो असं म्हणता येणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या एका अभ्यासानुसार, लॉन्ग कोविडची प्रकरणं समोर आली आहेत. यात लहान मुलांमध्ये लॉन्ग कोव्हिडची लक्षणं अद्यापही दिसून येत आहेत.

लॅन्सेट या सायन्स जर्नलने हा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, संसर्गातून बरे झाल्यानंतरही 46 टक्के मुलांमध्ये लॉन्ड कोविडची लक्षणे दिसत आहेत. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर किमान दोन महिन्यांपर्यंत ही लक्षण काय राहत आहेत.

- Advertisement -

डेन्मार्कमधील 14 वर्षांपर्यंतच्या मुलांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात अशा 11 हजारांहून अधिक मुलांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय 33 हजारांहून अधिक मुलांचा समावेश आहे ज्यांना कधीच कोरोना झाला नाही. या सर्वेक्षणात लॉन्ग कोविडच्या 23 लक्षणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही, एकच लक्षण किमान दोन महिने राहिल्यास तो दीर्घ काळ कोविड मानला जातो. अभ्यासात असेही दिसून आले की, 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना मूड स्विंग, पुरळ येणे आणि ओटीपोटात दुखणे यासारखी लक्षणं दिसून आली. तर 4 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्येही मूड स्विंग, लक्ष केंद्रित न होणे आणि पुरळ उठणे यासारख्या समस्या होत्या. त्याच वेळी 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना थकवा, मूड स्विंग आणि लक्ष केंद्रित न होणे अशी लक्षणं दिसली.

- Advertisement -

अभ्यासानुसार, 3 वर्षांपर्यंतच्या 40 टक्के मुलांमध्ये दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ कोविडची लक्षणे होती. लॉन्ग कोविड 4 ते 11 वर्षे वयोगटातील 38 टक्के मुलांमध्ये विशेषत: लॉन्ग कोविडची लक्षणं दिसली. त्याचवेळी 12 ते 14 वर्षे वयोगटातील 46 टक्के मुलांमध्ये दोन महिन्यांनंतरही ही लक्षणं दिसून आली.

अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, मूड स्विंग, थकवा, डोकेदुखी आणि पोटदुखी यासारख्या समस्या सामान्यतः मुलांमध्ये कायम राहतात, परंतु ज्या मुलांमध्ये कोरोना झाला नाही, त्यांच्यामध्ये ही समस्या काही दिवस टिकते, तर ज्या मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहते. संशोधकांचे म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या एक तृतीयांश मुलांमध्ये आता अशा समस्या दिसून येत आहेत, ज्या कोरोनाची लागण होण्यापूर्वी जाणवत नव्हत्या.


‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदेंकडून कायदेशीर लढाई सुरू? मूळ पक्षासाठी प्रयत्न करणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -