घरदेश-विदेशबेरुत स्फोटानंतर आठवडाभरात लेबनॉनच्या पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

बेरुत स्फोटानंतर आठवडाभरात लेबनॉनच्या पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

Subscribe

बेरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर आठवडाभरात लेबनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी आपला राजीनामा लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे.

लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली आणि विद्ध्वंसक स्फोटानंतर आठवडाभरात संपूर्ण मंत्रीमंडळाने राजीनामा दिला आहे. लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी बेरुत स्फोटांमुळे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिल्याने आठवडाभरात सरकार पायउतार झालं आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी देशाला संबोधताना सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली.

बेरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर तिथल्या सरकारविरोधात जनक्षोभ वाढला. त्यानंतर पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र संपूर्ण सरकारनेच राजीनामा देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पंतप्रधानांनी संध्याकाळी देशाला संबोधताना राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे. तथापि, नवी मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत पदावर कायम राहा, असं राष्ट्रपतींनी पंतप्रधान हसन दियाब यांना सांगितलं आहे.

- Advertisement -

आधीपासूनच लेबनॉनच्या जनतेत सरकारबद्दल नाराजी होती. दरम्यान, अनेक वर्षांपासून बंदरावर असुरक्षित पद्धतीने ठेवलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेटचा गेल्या मंगळवारी स्फोट झाला, ज्यात २०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले. बेरुतचे राज्यपाल मरवान अबूद यांच्या माहितीनुसार अजूनही ११० जण बेपत्ता आहेत. यापैकी बहुतांश परदेशी कर्मचारी आणि ट्रक चालक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मी खूप अभ्यास करेन, मेहनत घेईल; शिक्षण मंत्र्यांनी घेतला ११वीला प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -