घरदेश-विदेशलिंक्डइन वापरत असाल तर सावधान! तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर; असे करा अकाऊंट सेफ

लिंक्डइन वापरत असाल तर सावधान! तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर; असे करा अकाऊंट सेफ

Subscribe

प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइन (LinkedIn) च्या लोकप्रियतेचा फायदा आता सायबर गुन्हेगार देखील घेत आहेत, हे सायबर गुन्हेगार युजर्सची पर्सनल माहिती चोरण्यासाठी अनेक मार्गांनी लक्ष्य करत आहे. यामुळे लिंक्डइन आता हॅकर्ससाठी एक टॉप ब्रँड बनला आहे. ज्यामाध्यमातून आता हॅकर्स युजर्सचा पर्सनल डिटेल्स फिशिंग अटॅकमधून चोरत आहेत.

चेक पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 45 टक्के अटँम्प्टसह फिशिंग अटॅकच्या बाबतीत लिंक्डइन पहिल्या स्थानी आहे. तर त्याची मूळ कंपनी मायक्रोसॉफ्ट यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 13 टक्के फिशिंग अटॅकचा प्रयत्न झाला आहे. यानंतर 12 टक्के फिशिंग अटॅक प्रयत्नासह DHL तिसऱ्या क्रमांकावर आहे. Adidas, Adobe आणि HSBC सारख्या लोकप्रिय ब्रँडचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे.

- Advertisement -

चेक पॉइंट सॉफ्टवेअरचे डेटा रिसर्च ग्रुप मॅनेजर ओमर डेंबिन्स्की म्हणाले की, फिशिंग ईमेल हॅकर्ससाठी एक आवश्यक टूल बनवले जात आहे. हॅकर्स लाखो युजर्सना यापेक्षा कमी किमतीत टारगेट करत आहे. सायबर क्रिमिनल्स ब्रँडच्या विश्वासाचा फायदा घेत युजर्सना सिक्योरिटीवरून चुकीची माहिती देतात. यानंतर ते युजर्सची पर्सनल माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.

रिसर्चर यांच्या मते, मायक्रोस़ॉफ्टशी संबंधित स्कॅम वेगाने वाढत असल्याने धोका वेगाने वाढतोय. इंडिव्हज्युअल युजर्ससग ऑर्गेनाइजेशनसाठी देखील धोकादायक आहे. तुमच्या अकाऊंट लॉगिन डिटेल्स हॅकर्सपर्यंत पोहचतात, त्यानंतर लगेच त्यांना सर्व ऍप्लिकेशन सारखे tems आणि sharepoint चा एक्सेस मिळतो.

- Advertisement -

या स्कॅममध्ये युजर्सला प्रथम लिंक्डइन कम्युनिकेशन स्टाईलमध्ये मॅलेशियस ईमेल पाठवले जातात. हे ईमेल कंपनीच्या अनेक पत्त्यांवरून येतात. परंतु युजर्स अशा लिंकवर क्लिक करून त्यांची पर्सनल डिटेल्स शेअर करतात. अशा ईमेल्सबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.


मी इंदिरा गांधींची सून, कोणालाही घाबरत नाही, ईडी चौकशीनंतर सोनिया गांधींची निडर प्रतिक्रिया


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -