घरताज्या घडामोडीLive Update: महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा - आरोग्यमंत्री

Live Update: महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा – आरोग्यमंत्री

Subscribe

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांची माहिती दिली. राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेली पिकं भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पिकंच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं होतं. अखेर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा – आरोग्यमंत्री

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

अर्णब गोस्वामींना तातडीचा कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य सरकारनं यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यामुळे युक्तिवाद ऐकण्यास असमर्थ असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम सलग दुस-या रात्री अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डात असणार आहे. अलिबाग सत्र न्यायालयात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान अर्णब गोस्वामीनं अलिबाग दंडाधिकारी कोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे.


रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी अमित शाह कोलकत्तामध्ये दाखल झाले आहेत.


गेल्या २४ तासांत देशात ५० हजार २०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७०४ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८३ लाख ६४ हजार ८६पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २४ हजार ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ५५ हजार ३३१ रुग्णांचा डिस्चार्ज दिला असून आतापर्यंत ७७ लाख ११ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


एनसीबीने आज अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकार हिला आज चौकशीसाठी बोलावले आहे.


देशात ३ नोव्हेंबरपर्यंत ११ कोटी ४२ लाख ८ हजार ३८४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतार्यंत १२ लाख ९ हजार २५ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी वाढत असला तरी रिकव्हरीचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ कोटी ८४ लाखांवर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १२ लाख ३० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ कोटी ४६ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -