घरमहाराष्ट्रराज्यात ५,२४६ नवे रुग्ण; ११७ जणांचा मृत्यू

राज्यात ५,२४६ नवे रुग्ण; ११७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४४, ८०४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,०३,४४४ झाली आहे. राज्यात १,०६,५१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४४, ८०४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ११७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २५, ठाणे १२, मीरा भाईंदर मनपा ४, नाशिक ५, पुणे ११, सोलापूर १४, कोल्हापूर ५ यांचा समावेश आहे. मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर २६, कोल्हापूर मनपा १०, सोलापूर २९, सांगली ५१ आणि नांदेड २३ अशी आहे. त्यामुळे राज्याच्या मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.

- Advertisement -

आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -