लॉकडाऊनमध्ये लहान मुलांमध्ये वाढला मुडदूस आजार,दर महिना १२ रुग्णांवर होतायत उपचार

मुडदूस आजाराने ग्रस्त असलेली १२ लहान मुले रुग्णालयात आली त्या मुलांच्या हाडांमध्ये वेदना होत्या.

Lockdown has increased rickets disease is rise in children, with more than 12 patients reported every month in delhi
लॉकडाऊनमध्ये लहान मुलांमध्ये वाढला मुडदूस आजार,दर महिना १२ रुग्णांवर होतायत उपचार

दिल्लीमध्ये गेल्या वर्षभरात मुडदूस आजाराचे (rickets disease)  रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. केवळ गरिब घरातील मुलेच नाही तर चांगल्या घरातील लहान मुलांमध्ये देखील हा आजार होत आहे. इंडियन स्पाइनल इंजरी सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी दरमहिन्यात जवळपास १२ हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आता या आजारात वाढ झाली आहे. मुडदूस आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण हे २ ते १२ वर्ष वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी रुग्णालयात मुडदूस आजाराने ग्रस्त असलेली १२ लहान मुले रुग्णालयात आली त्या मुलांच्या हाडांमध्ये वेदना होत्या. त्यांची तपासणी केल्यानंतर ते मुडदूस आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.

मुडदूस आजार होण्याचे कारण काय?

मुडदूस हा लहान मुलांमध्ये होणारा हाडाचा आजार आहे. व्हिटामीन डी, कॅल्शिअम आणि फॉस्फोरसची कमतरता असल्याने हा आजार होतो. यात शरीरातील हाडे दुखू लागतात, हाडे कमजोर होतात किंवा नरम पडण्यास सुरुवात होते. मुडदूस आजारामुळे लहान मुलांमध्ये पायांच्या समस्या किंवा चालताना पायांचे ठोपरे एकमेकांना आदळणे यासारख्या समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा लहान मुलांचे पाय वाकडे देखील होतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त काळ घरात घालल्याने सूर्याची किरणे शरिरावर पडत नाही त्यामुळे शरीरात व्हिटामिन डीची कमतरता निर्माण होते आणि यामुळे मुडदूस सारखे आजार होत आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्य किरणे हे व्हिटामीन डी मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. ज्यांना सूर्याची किरणे मिळाली त्या मुलांवर त्याचा फार चांगला परिणाम झाला. भारतातील उष्णकटिबंधीय देशांमध्ये मुडदूससारखे आजार होत नाहीत कारण त्या ठिकाणी सूर्य किरणे मुबलक प्रमाणात मिळतात. कोरोना लॉकडाऊनच्या एक महिनाआधी मुडदूस आजाराचे केवळ ३-४ रुग्ण समोर आले होते. ज्यात गरिब कुटुंबातील मुलांचा समावेश होता. त्यांना हा आजार कुपोषणामुळे झाला होता.

डॉक्टरांनी पुढे असे म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात लहान मुले पूर्ण वेळ घरात होती. त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या व्हिटामिन डी मिळणे बंद झाले त्यामुळे मुडदूस सारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली. लहान मुलांमध्ये मुडदूस सारखा आजार वाढू नये यासाठी लहान मुलांना सकाळी काही काळ कोवळ्या सूर्य किरणात घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – संडे हो या मंडे रोज खा अंडे…पण बॉईल की ऑम्लेट?