घरदेश-विदेशशिवसेना पाठोपाठ झारखंडचा लोक जनशक्ती पक्षही 'एनडीए'तून बाहेर

शिवसेना पाठोपाठ झारखंडचा लोक जनशक्ती पक्षही ‘एनडीए’तून बाहेर

Subscribe

महाराष्ट्र पाठोपाठच आता झारखंडमधील लोक जनशक्ती पक्ष (लोजप) हा प्रादेशिक पक्ष देखील भाजपवर नाराज आहे. त्यामुळे या पक्षाने भाजपसोबत असणारी युती तोडली आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद टोकाला गेले. त्यामुळे युती तुटली असे जगजाहीरपणे दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना सारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षासोबत असणारी युती तुटणे हा भाजपसाठी मोठा फटका आहे. महाराष्ट्र पाठोपाठच आता झारखंडमधील लोक जनशक्ती पक्ष (लोजप) हा प्रादेशिक पक्ष देखील भाजपवर नाराज आहे. त्यामुळे या पक्षाने भाजपसोबत असणारी युती तोडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. या राज्यात लोजप या प्रादेशिक पक्षाची भाजपसोबत युती आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक होत आहेत. एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर लोजप आणि भाजपचे बिनसले. लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी भाजपकडे निवडणुकीसाठी सहा जागांची मागणी केली होती. मात्र, लोजपशी चर्चा न करता भाजपने रविवारी आपल्या ५२ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे चिराग पासवान नाराज झाले आहेत. याच नाराजगीतून त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात त्यांनी घोषणा देखील केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेला झटका


महाराष्ट्रातही भाजपला मोठा फटका

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेल्यामुळे त्यांची युती तुटल्याचे जाहीर झाले आहे. शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएतून बाहेर पडल्याशिवाय काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्यास तयार नव्हती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या केंद्रातील एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अरविंद सावंत यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. या राजीनाम्यामुळे शिवसेनेचा भाजपशी असलेला संबंध तुटला आणि काँग्रेस पाठिंबा देण्यास तयार झाली. शिवसेनेने अधिकृतपणे युती तोडली असे जाहीर केलेले नसले तरी ते उघडपणे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -