घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : न्यायालयात दाद मागणार, रश्मी बर्वे प्रकरणी वडेट्टीवारांची संतप्त प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar : न्यायालयात दाद मागणार, रश्मी बर्वे प्रकरणी वडेट्टीवारांची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या प्रकारावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जातपडताळणी समितीने हा निकाल अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन दिला असून याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, लोकसभा उमेदवार रश्मी बर्वेंचे जात प्रमाणपत्र रद्द

- Advertisement -

भाजपाला पराभवाची भीती असल्यानेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचा आतापासून छळ सुरू झाला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात साम, दाम, दंड, भेद या सूत्रांचा वापर भाजपाने केला आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

- Advertisement -

लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचे निःपक्ष वागणे अपेक्षित असताना यंत्रणांचे वर्तन मात्र, याच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळेच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द केले आहे. लोकशाही मार्गाने, जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यावर अन्याय झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मी रडणारी नाही, लढणारी वाघीण; मुनगंटीवारांच्या टीकेला धानोरकरांचे चोख प्रत्युत्तर

कायद्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 रोजी रश्मी बर्वे यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाले होते, त्यामुळे जातपडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे, त्यामुळे या समितीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

जी समिती जात प्रमाणपत्र देते, ती समिती जातवैधता प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. जात प्रमाणपत्राबाबत समितीने 20 मार्च रोजी नोटीस दिली आणि आठ दिवसांत हे प्रमाणपत्र रद्द केले, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले की, इतके झाले तरी काँग्रेस लढत राहणार आणि या निकालाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.

हेही वाचा – Jayant Patil : ‘चारसौ पार’ची स्वप्ने पाहणाऱ्यांनी तरुणांची स्वप्ने चिरडून टाकली, जयंत पाटलांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -