घरदेश-विदेशहा मंत्री म्हणाला हनुमान खेळाडू, त्याला जात लावू नका

हा मंत्री म्हणाला हनुमान खेळाडू, त्याला जात लावू नका

Subscribe

भारतात सध्या ‘हनुमानाची नक्की जात कंची…’ या विषयावरुन चर्चेचे गुऱ्हाळ रंगत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होते, असे वक्तव्य केल्यानंतर हनुमानाची जात शोधण्याची स्पर्धाच जणू राजकीय पुढाऱ्यांमध्ये लागली होती. मात्र उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांनी यावर समंजस्य भूमिका घेत आपले म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले की, “हनुमान खेळाडू होते. आजही अनेक खेळाडूंसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत. देवाची कोणतीही जात नसते. त्यामुळे त्यावर चर्चा नको.” अशी भूमिका चौहान यांनी मांडली आहे.

“माझ्या माहितीप्रमाणे हनुमान खेळाडू असून त्यांनी आपल्या शत्रूंना कुस्तीत हरवले होते. भारतातील सर्व खेळांमधले खेळाडू हनुमानाची पुजा करतात. आपापल्या खेळामध्ये विजयश्री मिळवण्यासाठी ताकद मिळावी, अशी प्रार्थना करतात. हनुमानाच्या अमुकतमुक जातीसाठी खेळाडू हनुमानाला पुजत नाहीत. देवाची कोणतीही जात नसते. मी हनुमानाला देव मानतो आणि कोणत्याही जाती समुहासोबत हनुमानाला जोडणार नाही.” अशी प्रतिक्रियाच चेतन चौहान यांनी दिली आहे.

- Advertisement -

योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अलवार जिल्ह्यात जाहीर सभेत बोलताना हनुमानाच्या जातीचा उल्लेख केला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी पुढे येत हनुमानाला विविध जातींशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हनुमान हा आपल्याच समुहातला आहे, हे दाखवण्याचा नाहक वाद समाजात निर्माण झाला होता.

- Advertisement -

हे वाचा – हनुमान भारतीय नाही तर चीनी होते – किर्ती आझाद


हनुमान मुस्लिम होते; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


हनुमान जैन होते!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -