घरदेश-विदेशहनुमान मुस्लिम होते; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

हनुमान मुस्लिम होते; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

हनुमान जे कोणी होते ते पूर्ण जगाचे होते, प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक जातीचे होते. ते प्रत्येक धर्माचे लाडके होते असे भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी म्हटले आहे.

हनुमान कोण होते यावरुन गेल्या काही दिवसापासून राजकारण सुरु आहे. हनुमान दलित होते, हनुमान आदिवसी होते, हनुमान जैन होते असा दावा अनेक राजकीय नेत्यांनी केला होत्या त्यानंतर आता भाजपच्या एका आमदाराने हनुमान मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एका राजकारण तापले आहे. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हनुमान हे मुसलमान होते, असा दावा त्यांनी केला आहे. लखनऊमध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी हनुमान मुस्लिम होते असे आम्ही मानत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हनुमान मुस्लिम होते

भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी असे म्हटले आहे की, जेव्हा हनुमानाला जाती- धर्मामध्ये वाटण्याची गोष्ट येते. तेव्हा मी असे सांगतो की, हनुमान जे कोणी होते ते पूर्ण जगाचे होते, प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक जातीचे होते. ते प्रत्येक धर्माचे लाडके होते. आम्ही असे मानतो की, हनुमान हे मुस्लीम होते म्हणूनच आमच्या इथे मुलांची जी नावं ठेवली जातात ती रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. ती हनुमानाच्या नावावरुनच ठेवली जातात, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार बुक्कल नवाब यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – हनुमान दलित असून मनुवाद्यांचा गुलाम – सावित्रीबाई फुले

- Advertisement -

हनुमानाच्या नावाशी मिळते जुळते नाव

बुक्कल नवाब ऐवढ्यावरच थांबले नाही पुढे त्यांनी असं म्हटले आहे की, आमचे हिंदु मित्रांनी सांगा की, किती लोकं ज्यांची नावं हनुमान यांच्या नावावर आहेत. त्यांनी त्यांची नावं थेट हनुमान तरी ठेवायचे होते. मात्र हनुमानाशी मिळते जुळते नावं इस्लाममध्येच ठेवली जातात. हे आमच्या मुसलमानामध्ये आहे. आमच्याकडे जेवढी नावं ठेवली जातात ती हनुमानाच्या नावाशी मिळते जुळते असतात त्यामुळे आम्ही हनुमान मुस्लिम असल्याचे मानतो.


हेही वाचा – हनुमान जैन होते!


अयोध्येत मस्जिद बांधा

यापूर्वीही बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. लखनऊमध्ये अल्पसंख्याक मोर्च्या दरम्यान त्यांनी अयोध्येतील वादग्रस्त स्थळावर मशीद उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसंच रक्षाबंधनाच्यावेळई त्यांनी मुस्लिम महिलांसोबत गायीला राखी बांधली आणि गोरक्षेचा संकल्प केला होता.


हेही वाचा – नंदकुमार साय म्हणाले, हनुमान दलित होते


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -