घरताज्या घडामोडीसंजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी, जाणून घ्या काय आहेत आरोप?

संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी, जाणून घ्या काय आहेत आरोप?

Subscribe

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं असून त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे.रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राऊतांना पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आले. मात्र, कोर्टातील सुनावणीनंतर राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी कोर्टात आज सुनावणी पार पडली असून पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला. त्यांच्यावर अजून कोणते आरोप करण्यात आले आहेत. हे जाणून घेऊयात?

- Advertisement -

हेही वाचा : २०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व शिकवताहेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

१) पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊतांचा हात

- Advertisement -

प्रविण राऊत हे नुसते फ्रन्ट मॅन असून संजय राऊत यांचा पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

२) राऊतांच्या खात्यात १ कोटी ६ लाख रूपये

प्रविण राऊत हे पत्राचाळीतील डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रूपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवण्यात आले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा राऊतांना झाला आहे.

३) प्रविण राऊत हे फक्त नावालाच, खरे आरोपी राऊतच

या प्रकरणात ज्यांचं नाव सुरूवातीला समोर आलं होतं. तसेच ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली ते प्रविण राऊत हे नावालाच होते. मात्र, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून व्यवहार करत होते, असं ईडीने कोर्टात सांगितलं. त्यामुळे पत्राचाळीतील गैरव्यवहार आणि अलिबाग येथील जमिनीतील सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले आहे.

४) राऊतांनी साक्षीदारांना धमकावलं

या प्रकरणात संजय राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने कोर्टात सांगितलं आहे. संजय राऊतांना जर सोडलं तर ते पुन्हा अशाच प्रकारचं कृत्य करू शकतात. त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली आहे.


हेही वाचा : शिवसेना खासदार संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -