घरCORONA UPDATEOmicron : ओमिक्रॉनचा BA.2 नव्या स्ट्रेन भारतात धडकला, राज्यात अनेक रुग्णांना संसर्ग

Omicron : ओमिक्रॉनचा BA.2 नव्या स्ट्रेन भारतात धडकला, राज्यात अनेक रुग्णांना संसर्ग

Subscribe

आतापर्यंत भारतात या स्ट्रेनचे 530 सँपल्स सापडले आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहेत. अशातच एक खासगी वैद्यकीय संस्थेच्या प्रयोगशाळेत गेल्या 18 दिवसांत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.20 या नव्या स्ट्रेनचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे.

यावर शहरातील श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक अध्यक्ष विनोद भंडारी यांनी सांगितले की, केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त मॉलिक्युलर व्हायरोलॉजी डायग्नोस्टिक अँड रिसर्च लॅबमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.2 स्ट्रेनचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. ६ जानेवारीपासून हे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान नव्या BA.2 स्ट्रेनच्या 21 रुग्णांपैकी, सहा रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम एक टक्क्यांपासून 50 टक्क्यांपर्यंत होता.

- Advertisement -

21 रुग्णांपैकी तीन रुग्ण रुग्णालयात दाखल

भंडारी म्हणाले की, या 21 रूग्णांपैकी तीन रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर १८ जणांना उपचारानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या 21 रुग्णांमधील15 प्रौढांनी आधीच कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे सर्वाधिक लोकांनी महामारीला रोखण्यासाठी लवकरात लवकर कोरोनाविरोधी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

इंदूरला कोरोनाचा सर्वाधिक फटका

विशेष म्हणजे, इंदूर हा कोरोनाचा सर्वाधिक प्रभावित जिल्हा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 24 मार्च 2020 पासून इंदूर जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 1,86,216 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 1,409 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

ओमिक्रॉनच्या नव्या स्ट्रेनने वाढवली चिंता

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने कहर केला आहे. या सर्व परिस्थितीत, ओमिक्रॉनच्या नव्या BA.2 स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत भारतात या स्ट्रेनचे 530 सँपल्स सापडले आहेत.


स्वदेशी RT-PCR किट ‘ओम’ करणार आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचे डिटेक्शन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -