घरदेश-विदेशEarthquake: अंदमान-निकोबारमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; सौम्य धक्क्याने हादरली जमीन

Earthquake: अंदमान-निकोबारमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; सौम्य धक्क्याने हादरली जमीन

Subscribe

मंगळवारी सकाळी अंदमान आणि निकोबारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल होती. या भूकंपामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवित हानी किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नसल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअर, अंदमान-निकोबार येथे सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल होती आणि त्याची खोली 30 किमीच्या आत होती.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या दरम्यान, भूकंपाचे धक्के लक्षात घेता मेट्रो ट्रेन काही काळासाठी थांबवावी लागली होती. हैदराबादजवळ त्याच दिवशी 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा मध्यम भूकंप झाला होता. तर रविवारी सिक्कीममधील गंगटोकमध्ये 4.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याची माहिती आहे. यासोबतच सोमवारी रात्री ईशान्येकडेही भूकंपाचे धक्के जाणवले. मणिपूरच्या मोइरंगमध्ये रात्री 8:16 वाजता 3.7 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची खोली जमिनीपासून 58 किमी होती. मणिपूरच्या आधी रविवारी रात्री उशिरा 12.38 वाजता नागालँडच्या कोहिमामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. कोहिमा येथील भूकंपाची तीव्रता 3.2 होती.

- Advertisement -

 

भूकंपाचे केंद्र आणि तीव्रता म्हणजे काय?

भूकंपाचे केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली भूगर्भीय ऊर्जा प्लेट्सच्या हालचालीद्वारे सोडली जाते. या ठिकाणी भूकंपाची कंपने जास्त असतात. जसजसे कंपनाची वारंवारता निघून जाते, तसा त्याचा प्रभाव कमी होतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला असेल तर, त्याचे हादरे साधारण 40 किमीच्या परिघात अधिक जोरदार बसतात. परंतु भूकंपाची वारंवारता ऊर्ध्वगामी आहे की श्रेणीवर आहे यावर देखील त्याचे धक्के अवलंबून असतात. जर कंपनांची वारंवारता जास्त असेल तर कमी क्षेत्र प्रभावित होत असतात.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -