घरताज्या घडामोडीमहंत नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरण-संपत्तीचा वाद की व्हिडीओ ब्लॅकमेलिंग, मृत्यूचे गूढ वाढले

महंत नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरण-संपत्तीचा वाद की व्हिडीओ ब्लॅकमेलिंग, मृत्यूचे गूढ वाढले

Subscribe

महंत गिरी यांच्या मृत्यूमागे संपत्तीचा वाद असल्याचे कारण असून त्यांना व्हिडीओच्या माध्यमातून कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याचेही समोर आले आहे.

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने त्यामागचे गूढही वाढले आहे. प्राथमिक तपासात जरी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी उत्तर प्रदेश पोलीस सर्व बाजूने याप्रकरणाचा तपास करत आहे. याचदरम्यान, महंत गिरी यांच्या मृत्यूमागे संपत्तीचा वाद असल्याचे कारण असून त्यांना व्हिडीओच्या माध्यमातून कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याचेही समोर आले आहे.

महंत गिरी याच्या रुममध्ये पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात शिष्य आनंद गिरी आपला मानसिक छळ करत असल्याचा आरोप महंत यांनी केला आहे. गेले अनेक महिने महंत गिरी आणि आनंद गिरी यांच्यात उत्तराधिकारीपदावरून वाद सुरू होता. यामुळे महंतच्या मृत्यूचा संबंध आनंद गिरी यांच्याशी असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर गिरी यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान मीडियाशी बोलताना आनंद गिरी यांनी आपल्याला याप्रकरणात अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तसेच महंत गिरी आत्महत्या करु शकत नाहीत. तर संपत्तीसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही आनंद गिरी यांनी केला आहे. तसेच ज्यांनी ही हत्या केली त्यांनीच महंत आणि आपल्यात भांडण लावून दिले होते. असेही आनंद गिरी यांनी म्हटली आहे. त्याचबरोबर एक वर्षापासून महंतपासून आपणाला दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच मी १२०० किमी लांब राहून कसा काय एखाद्याला आत्महत्येसाठी उकसवू शकतो असेही आनंद गिरी यांनी म्हटल आहे. मला यात फसवूण संपत्ती लाटण्याचा काहीजणांचा डाव असल्याचाही आरोप आनंद गिरी यांनी केला आहे.

तर दुसरीकडे महंत यांना व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे समोर आले आहे. यामागे समाजवादी पार्टीशी संबंधित असलेल्या एका मंत्र्याचेही नाव असून ती व्यक्ती आनंद गिरी यांच्या जवळची आहे. तसेच अनेकवेळा ती नरेंद्र गिरी यांना मठात भेटण्यासही यायची. यामुळे पोलिसांनी महंत यांच्या फोन कॉलची डिटेल्सही मागवली आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -