घरताज्या घडामोडीपरदेशातून सोलापूरच्या केळींना मागणी, केळी निर्यातीत महाराष्ट्र ठरला नंबर १

परदेशातून सोलापूरच्या केळींना मागणी, केळी निर्यातीत महाराष्ट्र ठरला नंबर १

Subscribe

जगभरातून भारतातील केळींना मागणी असते. पण जगभरातील देशांची ही केळींची मागणी पुर्ण करण्यामध्ये यंदा सर्वाधिक योगदान देण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. देशात महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक केळी निर्यात करणारे असे राज्य ठरले आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत १.३४ लाख टन इतक्या मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करण्याचा विक्रम यंदा महाराष्ट्राच्या नावे झाला आहे. याच कालावधीत देशात १.९१ टन इतक्या प्रमाणात केळीची निर्यात झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर आणि सोलापूर यासारख्या राज्यांनी आता केळी उत्पादनात सरशी घेतली आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूरमधील केळींना आता युरोपमधून मोठी मागणी आहे. तर महाराष्ट्रातील केळींना इराण, इराक, दुबई आणि ओमानमधून महाराष्ट्रातील केळींना मागणी आहे.

कोणत्या राज्यात केळींचे किती उत्पादन ?

दक्षिण भारतात केरळ येथून १८ हजार ८६८ टन इतक्या प्रमाणात केळ्यांची निर्यात झाली. त्यापाठोपाठ तामिळनाडू येथून ६२८०.५२ टन इतक्या प्रमाणात केळी निर्यात झाली. उत्तर प्रदेशातून २९ हजार ९२४.९३ टन तर पश्चिम बंगालमधून ३५३२.७७ टन इतक्या प्रमाणात केळी वितरीत करण्यात आली. एकट्या महाराष्ट्रातून ४५५.५० कोटी रूपये इतक्या किमतीची केळी केरळला वितरीत करण्यात आली. तर केरळमधून १०३.८७ कोटी रूपयांची केळी वितरीत करण्यात आली. देशात या कालावधीत एकुण ६१५.८ कोटी रूपयांची केळी निर्यात करण्यात आली.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या केळींना निर्यातीतला वाटा किती ?

महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे तांत्रिक सल्लागार असलेले गोविंद हांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट केले की, महाराष्ट्रात ९० हजार हेक्टरमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. देशभरात जवळपास ८ लाख हेक्टरवर केळीचे उत्पादन घेण्यात येते. अनेक राज्यात आयातीसाठीच्या केळीच्या वेगवेगळ्या जातीचे उत्पादन घेण्यात येते. केरळ, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश ही राज्ये केळी उत्पादनात मोठी राज्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी परभणी आणि नांदेड जिल्ह्यात हे जिल्हे महत्वाचे योगदान देतात. त्यासोबतच जळगाव, कोल्हापूर, सोलापूर यासारखे जिल्हेही केळी उत्पादनात महत्वाचे योगदान देत आहेत. यंदा अवकाळी पावसामुळे २०-३० टक्के केळीच्या पिकाचे यंदा नुकसान झाले.

महाराष्ट्रातील केळ्यांची निर्यात ‘या’ देशांमध्ये

आतापर्यंत महाराष्ट्रातून प्रत्येकी २० टन क्षमतेचे १६०० कंटेनर एकट्या जळगावमधून आयात करण्यात आले आहेत. भारतीय केळ्यांना मुख्यत्वेकरून इराण, इराक, मस्कट आणि बहरेन तसेच युरोपमधून अधिक मागणी आहे. या कालावधीत आयात केलेल्या केळ्यांमध्ये कमाल १७०० क्विंटल तर किमान १२०० क्विंटल अशा पद्धतीने कंटेनर्स व्यापाऱ्यांकडे येत असतात. यंदा नंदुरबारच्या शहाा तालुक्यातून एकुण ५८० कंटेनर्स आयातीसाठी उपलब्ध झाले. तर जळगावहून जवळपास ७०० कंटेनर्स आणि नांदेडमधून २०० टन केळी ही इराण, इराक, दुबई आणि ओमनला पाठवण्यात आली आहेत. सध्या महाराष्ट्रात ट्रेसिबिलिटी सिस्टिम सेट अप करण्यात आली आहे. त्यामध्ये आयात करण्यात येणाऱ्या फळांमध्ये द्राक्षे, डाळींब, आंबा, भाज्या यासारखी फळे आणि भाज्यांची परदेशात आयात करण्यात येते.\

- Advertisement -

सोलापूरच्या केळींना युरोपातून मागणी 

Agricultural and Processed Food Products Export Development Authority (Apeda) ने बनाना नेट नावाचे सॉफ्टव्हेअर विकसित केले आहे. ही सॉफ्टव्हेअर १ जुलैपासून कार्यरत होईल. महाराष्ट्राचा एकुण केळी निर्यातीतील वाटा ७० टक्के इतका आहे. बनाना नेटच्या माध्यमातून केळी निर्यातीमध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे. देशात केळीची निर्यात ही ३५ हजार टनवरून आता १.९१ लाख इतकी २०२०-२१ पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्राचा या निर्यातीमधील वाटा हा ७० टक्के इतका आहे. महाराष्ट्रात सोलापूरच्या केळींना मागणी आहे. सोलापूरच्या केळींना युरोपमध्ये मागणी आहे. भारत हा केळींमध्ये मोठा उत्पादन घेणारा देश असला तरीही केळी आयात करण्याच्या बाबतीत मात्र अजुनही भारताचा वाटा छोटाच आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -