Live Update: राज्यात गेल्या २४ तासांत २,८४४ नव्या रुग्णांची वाढ, ६० जणांच्या मृत्यूची नोंद

corona update 18 october 2021 t20 world cup 2021 Kerala Rain yuvraj singh political happenings
corona update 18 october 2021 t20 world cup 2021 Kerala Rain yuvraj singh political happenings

राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ४४ हजार ६०६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार ९६२ जणांचा मृत्यू झाला असून ६३ लाख ६५ हजार २७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ३६ हजार ७९४ सक्रीय रुग्ण आहेत.


पुढील ३ तास राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, रायगड येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारला नाही आहे. हायकंमाड म्हणाले की, स्थानिक पातळी प्रकरण मिटवा.


काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या केरळमधील कोझीकोड आणि मल्लपुरमला भेट देणार आहेत.


८ तासांच्या ईडी चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालया बाहेर आले आहेत. ईडीने जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तर ईडीला दिली आहेत.


नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.


शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार- धनंजय मुंडे


पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा


मोफत शिवभोजन थाळी होणार बंद


सीरम इन्स्टिट्यूटला लहान मुलांवर चाचणी करण्यास मंजुरी


कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना


किरीट सोमय्या अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरात पोहचले, किरीट सोमय्या मुरगूडमध्ये हसन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करणार


अनिल परब ईडी कार्यालयात दाखल


मी आज चौकशीला जाणार आहे, तिथे गेल्यावरचं कळेल कशासाठी बोलवलं आहे, चौकशीला पूर्ण सहकार्य करेन, मी कोणतीही चुक केली नाही म्हणून मी चौकशीला सामोरे जाणार- अनिल परब


अनिल परब यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. याआधीही अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते.मात्र त्यावेळी चौकशीसाठी अनिल परब गैरहजर राहिले होते. अनिल परब आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.


आज कोकण,उत्तर आणि मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होऊन गुजरातच्या दिशेने सरकणार आहे.


मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहेत. या परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी स्वरुपात घेतल्या जाणार आहेत.


पुण्यात कोरोनाचा धोका कमी होऊन आता डेंग्यू या आजाराता संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुण्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाकडून डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. डिझेल ७५ पैशांनी महागले आहे. गेल्या पाच दिवसात डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली आहे.