घरदेश-विदेशLokSabha Election : महाराष्ट्राचे ठरेना; पण बिहारचं ठरलंय, जेडीयू - भाजपामध्ये असे...

LokSabha Election : महाराष्ट्राचे ठरेना; पण बिहारचं ठरलंय, जेडीयू – भाजपामध्ये असे आहे जागावाटप

Subscribe

पाटणा : एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांनी बिहारमधील ४० लोकसभा मतदारसंघांचं वाटप पूर्ण केलं आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. तावडे म्हणाले, आजच्या बैठकीत ठरलेला जागााटपाचा फॉर्म्युला आमच्या सर्व पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी मान्य केला आहे.

नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त) हा सत्ताधारी पक्ष एनडीएत सहभागी झाल्यामुळे राज्यात एनडीएची ताकद वाढली आहे. परंतु, एनडीएतील मित्रपक्षांची संख्या वाढल्याने आगामी लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, एनडीएतील प्रमुख नेत्यांनी हा तिढा सोडवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LokSabha Election : या दोन राज्यांमधील मतमोजणीच्या तारखेत बदल; नेमकं कारण काय?

जागावाटप कसे?

राज्यात भाजपा १७ जागा लढवणार आहे. तर संयुक्त जनता दलाला १६ जागा देण्यात आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला ५, जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला एक, तर उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे. दरम्यान, पशुपती पारस यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीला एकही जागा मिळालेली नाही. याचा अंदाज पारस यांना आधीच आला होता. दरम्यान, चिराग पासवान यांच्या पक्षाचे नेते राजू तिवारी म्हणाले, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर आमच्या पक्षाला राज्यात पाच जागा मिळाल्या आहेत. या पाचही जागा आम्ही जिंकू. तसेच राज्यातल्या ४० जागांवर आमच्या युतीचा विजय होईल.

- Advertisement -

सर्व जागा जिंकण्याचा विश्वास

“आम्ही पाच पक्ष बिहारमध्ये वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवणार असलो तरी ४० मतदारसंघांमध्ये आम्ही एनडीए म्हणून ताकदीने लढणार असून सर्व मतदारसंघांमध्ये विजय मिळवू,” असा विश्वासही विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Electoral Bond : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षाला मिळाले नाही निवडणूक रोखे

देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपसोबत जाणं पसंत केलं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीसोबतची युती तोडून नितीश कुमारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ते भाजपसोबत एनडीएच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित होतं. मात्र त्यांच्यासोबत इतरही मित्रपक्ष असल्याने एनडीएच्या जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. आता अखेर हा तिढा सुटला असून जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -