मनोहर पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक

manohar parrikar
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचारचे डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

फेब्रुवारी २०१८ मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर आधी मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते उपचारासाठी अमेरिकेला गेले. त्याठिकाणावरुन आल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात ही उपचार करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर गोव्यातच उपचार सुरु होते. शनिवार सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असून निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पर्रिकर यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक, गोव्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. तसेच निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.